इतक्या क’रोडो रु’पयांची आहेत ‘बिग बी’ यांच्या घरात लावलेली ही बैलाची ‘पेंटिंग’, बनवणारा देखील आहे खास…

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत एक बैलाचे पेंटिंग दिसत आहे. या पेंटिंगची किंमत ऐकून तुम्हीही तोंडात बोट घालाल. दिवाळी निमित्त, अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यात अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन-नंदा दिसत होते.

 

फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले, ‘वेळ बदलते पण काही फोटोंमध्ये बसण्याची पद्धत बदलत नाही. आता या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तर या फोटोत दिसणार्‍या बैलाच्या चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे चित्र वेलकम चित्रपटाच्या मजनू भाईने बनवले आहे का असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.

याच वेबसाईटनुसार, धुरी पंजाबमध्ये जन्मलेल्या मंजीत बावा यांनी हे पेंटिंग बनवले आहे. या पेंटिंगची किंमत ऐकून तुमचे तोंड उघडे राहील. इतक्या किमतीत तुम्ही कितीतरी घरे खरेदी करू शकता. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी या पेंटिंगच्या सौंदर्याबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते की, ‘बैल हे ताकद, धैर्य आणि आशावादाचे लक्षण आहे

.हे चित्र घरात ठेवून कोणतीही व्यक्ती आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊ शकते. यामुळे नकारात्मकतेची ऊर्जा कायम दूर राहते. अमिताभ बच्चन हे चित्रपट अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ते कौन बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालन करत आहेत. अमिताभ बच्चन यांचे चित्रपट खूप पसंत केले जातात.

 

हे पेंटिंग बनवणारे मंजीत बावा हे चित्रकलेच्या शिक्षणासाठी ब्रिटनलाही गेले होते, जिथे त्यांनी सिल्कस्क्रीन पेंटिंगची कला शिकून घेतली आणि 1964 ते 1971 या काळात ब्रिटनमध्ये सिल्कस्क्रीन पेंटर म्हणून काम केले. भारतात परत आल्यावर त्यांनी भारतीय पौराणिक कथा आणि सुफी पात्रांना त्यांच्या चित्रकलेचा विषय बनवले.

 

मंजीत बावा यांचा जन्म 29 जुलै 1941 रोजी पंजाबमधील धुरी शहरात झाला. चित्रकार असण्यासोबतच ते कुशल बासरीवादक म्हणूनही ओळखले जातात. त्यांना सुफी गायन आणि तत्त्वज्ञानात विशेष रस होता. लहानपणी मंजीत बावा यांनी महाभारतातील पौराणिक कथा, वारिस शाह यांचे काव्य आणि गुरु ग्रंथसाहिब ऐकले आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. चित्रकलेची त्यांची एक वेगळी शैली होती.

मंजीत बावा यांनी आपल्या चित्रांमधून भारतीय पुराणकथा नव्या पद्धतीने मांडल्या. जशी जवळपास प्रत्येक चित्रकाराला निसर्गाची ओढ असते, तसेच मंजीत बावा हे निसर्गप्रेमीही होते. त्यांनी आपल्या चित्रांमध्ये प्राणी-पक्षी आणि निसर्ग यांना विशेष महत्त्व दिले. बावा यांनी अनेक ठिकाणी प्रवास केला. देशातील ठिकाणे आणि तेथील दृश्येही रंगवली.

त्यांच्या चित्रांमध्ये त्यांनी पाश्चात्य रंगांव्यतिरिक्त लाल, जांभळा, पिवळा या पारंपरिक भारतीय रंगांचा वापर केला. मंजीत बावा यांनी काढलेली चित्रेही कोट्यवधी रुपयांना विकत घेण्यात आली. अलीकडेच त्यांनी बनवलेले चित्र ऑनलाइन लिलावात १.७ कोटींना विकले गेले. रांझासारख्या पात्रांनाही त्यांनी स्थान दिले. त्यांच्या चित्रात त्यांनी समकालीन भारतीय कलेमध्ये सुफी संवेदनांचा समावेश केला.

मंजीत बावांना त्यांच्या अप्रतिम चित्रकलेसाठी अनेक पुरस्कारही मिळाले. 1963 मध्ये त्यांना सैलोज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1980 मध्ये त्यांना ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि 2005-06 मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा कालिदास सन्मान मिळाला. बुद्धदेव दासगुप्ता यांच्या जीवनावर ‘मीटिंग मंजीत’ या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

अमिताभ बच्चन यांच्या घरात लावलेली ही पेंटिंग तब्बल 4 करोडो रुपयांची आहेत. सर्वसामान्य लोकांना इतक्या किंमतीत कितीतरी घरे विकत घेता येतील. या पेंटिंग ची किंमत ऐकून लोकही चकित झाले आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *