अरबाजला घटस्फोट दिल्यानंतर मलायकामध्ये झाला हा मोठा बदल

मनोरंजन | बॉलिवुडमध्ये प्रत्येक सेलिब्रिटींच्या नात्याची चर्चा सुरूच असते. कधी यांचं नात घडत तर कधी बिघडत अस पहायला मिळालं आहे. मलायका अरोरा खान आणि अभिनेता अरबाज खान यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला आहे हे सर्वांना महितेय. सध्या ती अर्जुन कपूरला डेट करताना दिसते. तर अरबाज जॉर्जिया अँड्रियानी या मॉडलेला डेट करतोय.

मध्यंतरी मलायकान एका मासिकाला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तीन अगदी बिन्धास्त उत्तर दिली. तिला त्यावेळी अरबाजच्या आणि तिच्या घटस्फोटाबाबत विचारलं असता ती म्हणाली ; आम्ही सध्या खूप खुश आहोत. दोन्ही व्यक्ती चांगल्या असल्या तरीही कधी कधी त्या एकमेकांसाठी असतीलच अस नाही. आमचंही नातं असंच काहीसं आहे. तो नेहमीच खूश राहावा अशी माझी इच्छा आहे. आता आम्ही दोघं पहिल्यापेक्षा खूप अधिक समजूतदारपणे वागतो.

का घेतला घटस्फोट: स्वत:ला प्राधान्य देण्यासाठी अरबाजपासून विभक्त झाल्याचं ती म्हणाली. त्याचप्रमाणे हा निर्णय घेतल्यामुळे स्वत:मध्ये अनेक सकारात्मक बदल झाल्याचं तिने सांगितलं. मुलासोबतचंही नातं पहिल्यापेक्षा सुधारल्याचं तिने स्पष्ट केलं. “मी आता अधिक खूश आहे हे तोसुद्धा पाहतोय”, असं मलायका म्हणाली. तुमचं मन काय म्हणतंय तेच ऐका आणि पुढे निर्णय घ्या. काही काळ कठीण जाईल, आव्हानांचा सामना करावा लागेल, पण त्यापुढचं आयुष्य खूप बरं असेल”, असा सल्ला तिने महिलांना दिला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *