या अभिनेत्रीने केले विक्रम भट्ट यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त; आत्महत्येचा…

मुंबई | प्रेमात पडलेल्या व्यक्तीला चांगल वाईट याची कशाची समज आणि पर्वा नसते असे म्हणतात. या जगात रोज लाखो लोक प्रेमात पडतात, तर अनेकांचे प्रेम तुटते. याचा त्रास या दोन्ही व्यक्तींना सहन करावा लागतो. बॉलीवूडमध्ये चित्रपटांप्रमाणे प्रेमाचा देखील नुसता सुळसुळाट आहे. यात अनेक व्यक्ती आपले आयुष्य देखील उध्वस्त करून बसल्या आहेत. त्यातीलच एक दिग्दर्शक विक्रम भट्ट.

विक्रम भट्ट हे देखील एका बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते. ज्यामुळे त्यांचा आयुष्य पूर्णतः उध्वस्त झाले. याची कबुली त्यांनी स्वतः दिलेली आहे. अनेक जण असे समजतात की विक्रम भट आणि महेश भट्ट हे दोघे एकमेकांचे भाऊ आहेत. मात्र तसे अजिबात नाही. विक्रम भट्ट यांनी आजवर अनेक हॉरर आणि काळजात धडकी भरवणाऱ्या चित्रपटांची भेट घालून दिली. त्यांच्या दिग्दर्शनात त्यांनी अनेक कलाकारांना मोठे नाव मिळवून दिले. मात्र यातील एका अभिनेत्रीने त्यांच्या जीवनातील सुख शांती आणि स्थैर्य सर्वकाही हिरावून घेतले.

27 जानेवारी 1969 रोजी विक्रम भट्ट यांचा मुंबई जन्म झाला. ते 14 वर्षाचे असतानाच त्यांना चित्रपटांची गोडी निर्माण झाली. तशी त्यांना ही आवड लहानपणापासूनच होती मात्र चौदाव्या वर्षात त्यांनी यामध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर याच क्षेत्रात पुढे करिअर करायचा निर्णय त्यांनी घेतला.

कॉलेजमध्ये असताना ते आदिती नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडले होते. आदिती देखील विक्रम भट्ट यांच्या प्रेमात होती. त्यामुळे पुढे या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगी देखील झाली. सुरुवातीचा काळ खूप चांगला गेला. मात्र नंतर हळूहळू विक्रम यांचे बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री बरोबर नाव जोडले जाऊ लागले.

यातील एका अभिनेत्रीच्या प्रेमाखातर त्यांनी जीव देण्याचा देखील प्रयत्न केला. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान विक्रम भट्ट सुष्मिता सेनला भेटले होते. सुष्मिताला पाहता क्षणी ते तिच्या प्रेमात पडले. पुढे या दोघांची चर्चा जोरदार रंगली. विक्रम भट्ट सुस्मिताच्या प्रेमात अगदी वेडे झाले होते.

त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला देखील घटस्फोट दिला. एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले की, ” माझ्या पत्नीला आणि मुलीला मी आज सुद्धा खूप मिस करतो. सुष्मिता च्या प्रेमात पडल्यामुळे मी माझ्या पत्नीला घटस्फोट दिला. मात्र या गोष्टीचा आता मला खूप मोठा पश्चाताप होत आहे. सुष्मिता साठे मी एकदा जीव देण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र माझा आत्महत्येचा हा प्रयत्न यशस्वी ठरला.” असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

पुढे ते असे देखील म्हणाले की, ” सुष्मिता मुळे मी खूप उध्वस्त झाले. या सर्व गोष्टीची मला जाणीव झाल्यानंतर मी माझ्या पत्नीकडे पुन्हा गेलो. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. माझ्या पत्नीचे आणि माझे नाते पुन्हा कधी जुळू शकले नाही. मी माझ्या मुलीला खूप मिस करतो. माझा आयुष्य मी माझ्या हाताने उध्वस्त केले आहे याची मला जाणीव आहे. ”

विक्रम भट्ट यांच्या आयुष्यात सुश्मिता बरोबर असलेले अफेअर त्यांना खूप महागात पडले. त्यामुळे त्यांचे आयुष्य उध्वस्त झाले अशी कबुली त्यांनी स्वतः दिली आहे. मात्र या अफेअर नंतर त्यांचे नाव अभिनेत्री अमिषा पटेल बरोबर देखील जोडले गेले. यावेळी अमिषा विक्रम भट्ट यांच्यासाठी तिच्या आई-वडिलांबरोबर देखील भांडली होती.

“आप मुझे अच्छे लगने लगे” चित्रपटाच्या सेटवर हमेशा आणि विक्रम भट्ट एकमेकांच्या जवळ आले. तुलाच त्यांच्या प्रेमाची चर्चा जोर धरू लागली. असे असले तरी त्यांचे हे नाते देखील फार काळ टिकले नाही. अवघ्या पाच वर्षात या दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतरही विक्रम भट्ट यांचे नाव बऱ्याच अभिनेत्रीने बरोबर जोडले गेले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *