टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी या दोघांच्या ब्रेकअपला ही अभिनेत्री आहे जबाबदार

दिल्ली | अभिनेता टायगर श्रॉफ यानी आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या भन्नाट डान्स स्टेप्समुळे देखील तो नेहमी चर्चेत राहिला आहे. गेला अनेक दिवसांपासून तो आणि अभिनेत्री दिशा पटानी हे दोघे एकमेकांना डेट करत होते. एकमेकांच्या प्रेमात होते तसेच ते दोघे सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये. या दोघांना अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र स्पॉट केले गेले आहे.

सोशल मीडियावरती हे दोघे देखील नेहमी ऍक्टिव्ह असतात. दिशा टायगर बरोबर जिथे कुठे फिरायला जाते तेथील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. टायगरने देखील दिशा बरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे क्युट कपल अनेकांच्या पसंतीचे आहे. मात्र आता या जोडप्यामध्ये फूट पडलेली दिसत आहे.

या दोघांच्या नात्यावरती मोठे संकट आले आहे. गेला अनेक दिवसांपासून हे दोघे एकमेकांबरोबर बोलत नाहीत असे काही माध्यमांमधून समजत आहे. तसेच सोशल मीडियावर अशी देखील चर्चा सुरू आहे की या दोघांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र या दोघांचे ब्रेकअप हे दोघांमधील भांडणामुळे नाही तर टायगरच्या आयुष्यात एक नवीन मुलगी आल्यामुळे झाले आहे.

मनोरंजन विश्वातील कलाकार हे अनेक चित्रपटांमध्ये काम करत असताना एकत्र येतात. यावेळी एकत्र काम करत असताना या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण होतात. असाच काहीसा प्रकार टायगर श्रॉफ बरोबर देखील घडल्याचे दिसत आहे. त्याने दिशा पटानी बरोबर ब्रेकअप केला आहे. तसेच आता तो दुसऱ्या एका अभिनेत्री बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होत आहे.

टायगर श्रॉफने दिशा पटानीला सहा वर्ष डेट केले. या दोघांची जोडी अनेक चाहत्यांना आवडत होती. टायगर श्रॉफचे नाव आता अभिनेत्री आकांक्षा शर्मा बरोबर जोडले जात आहे. कॅसेनोवा आणि आय एम अ डिस्को डान्सर २.० या दोन गाण्यांमध्ये टायगर आकांक्षाबरोबर झळकला आहे. या दोन्ही गाण्यांमध्ये त्याने आकांक्षाबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. अशात आता सध्या तो या अभिनेत्रीला डेट करत असल्याचे अनेक माध्यमांवरती सांगण्यात आले आहे.

एका मुलाखतीमध्ये टायगरला आकांक्षा शर्मा बद्दल विचारण्यात आले होते. तुम्ही दोघे एकमेकांना डेट करत आहात का? असा सवाल विचारण्यात आला होता. मात्र यावेळी टायगर श्रॉफने याला नकार दिला होता. आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत आम्हा दोघांना देखील एकमेकांची कंपनी आवडते. मात्र आमच्यामध्ये असे काहीच नाही. असे त्यांनी स्पष्ट केले होते.

साल 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिरोपंती या चित्रपटातून टायगर श्रॉफने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने बागी२, बागी ३, हिरोपंती २ अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. लवकरच तो गणपत आणि बडे मिया छोटे मिया या मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये देखील तो व्यस्त आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *