या अभिनेत्रीची झाली खुपचं बिकट परिस्थिती; दोन मुलांच्या बापावर प्रेम केले आणि…

दिल्ली | 60-70 च्या दशकातील अभिनेत्री प्रिया राजवंश आज हयात नाहीत. पण आजही ती लोकांच्या हृदयात आहे. तिचे संपूर्ण आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे होते. 1964 मध्ये आलेल्या ‘हकीकत’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट प्रचंड गाजला. देवानंद यांचे मोठे बंधू चेतन आनंद, जे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते, त्यांनी अभिनेत्रीला इंडस्ट्रीत आणले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया राजवंशने चेतनसोबत सर्वाधिक चित्रपट केले होते. यामध्ये ‘हीर रांझा’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘हंस्ते जख्म’, ‘साहेब बहादूर’, ‘कुदरत’ आणि ‘हाथ की रखना’ या चित्रपटांचा समावेश आहे. या दोघांची जवळीक वाढू लागली आणि प्रियालाही चेतन खूप आवडला. त्यानंतर हे दोघे एमेकांच्या प्रेमात पडले. त्या काळी या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा खूप सुरू होत्या. अभिनेत्री त्याच्या प्रेमात पूर्णतः वेडी झाली होती.

चेतन आधीच विवाहित होता आणि पत्नी आणि मुलांपासून वेगळा राहत होता. असे म्हटले जाते की या दोघांनी एकत्र आयुष्य खूप सुखी आयुष्य जगले. मात्र त्यांच्या या सुखाला कुणाची तरी नजर लागली. साल 1997 मध्ये चेतनचा मृत्यू झाला. यामुळे अभिनेत्री खूप खचून गेली.

काही काळानंतर या अभिनेत्रीच्या हत्येची बातमी समोर आली. असे म्हटले जाते की, चेतन आधीच विवाहित होता. त्याला दोन मुलं होती. तरी तो प्रिया वर प्रमे करत होता. आपल्या आईला झालेला त्रास या मुलांना सहन होत नव्हता. त्यामुळे त्यांनी वडिलांच्या मृत्यू नंतर अभिनेत्रीची हत्या केली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *