प्रेमात आलेल्या अपयशामुळे या अभिनेत्रीने केली आत्महत्या…

मुंबई | मॉडेल नफिसा जोसेफ हे चित्रपटसृष्टीतील एक अशी अभिनेत्री होती, जिने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली होती. पण प्रेमात झालेली फसवणूक तिला सहन होत नव्हती. मॉडेल आणि अभिनेत्री नफीसाने 29 जुलै 2004 रोजी तिच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

लग्न मोडल्यामुळे नफिसाने हे पाऊल उचलल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. नफिसा उद्योजक गौतम खंडुजासोबत लग्न करणार होती. लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी नफिसाला होणाऱ्या पती विषयी एक सत्य समजले. तिला असे समजले की, तिच्या होणाऱ्या पतीने आजुन त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही. मात्र त्याने तिला सांगितले होते की त्याने घटस्फोट दिला. सत्य गोष्ट समजताच तिच्या लक्षात आले की, त्याला त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता माझ्याशी लग्न करायचे आहे. त्यामुळे तिने हे मोठे टोकाचे पाऊल उचलले.

नफिसाचा जन्म 28 मार्च 1978 रोजी बंगळुरूमध्ये झाला. तिचे वडील कॅथलिक होते, तर आई बंगाली होती. नफिसाची आई उषा जोसेफ रवींद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबातील असून अभिनेत्री शर्मिला टागोर यांची चुलत बहीण होती. नफीसाचे पालनपोषण आणि शिक्षण बंगळुरूमध्येच झाले.
वयाच्या 12 व्या वर्षी तिने मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. नफीसाने वयाच्या 12 व्या वर्षी एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून मॉडेलिंगचे पहिले काम केले. यानंतर तिने या क्षेत्रासाठी स्वत:ला तयार केले आणि 1997 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला.

फेमिना मिस इंडियाचे विजेतेपद पटकावणारी ती सर्वात तरुण मॉडेल होती. यानंतर मिस युनिव्हर्स स्पर्धेतील टॉप 10 स्पर्धकांमध्ये नफिसाचाही समावेश झाला. अनेक टीव्ही शोमध्ये तिने काम केले. नफिसा 1999 मध्ये MTV VJ India Hunt मध्ये जज होती. सुमारे 5 वर्षे तिने एमटीव्ही हाऊसफुल शो होस्ट केला.

नफीसाच्या पालकांनी गौतम खंडुजावर त्यांच्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी गौतमने स्पष्टीकरण देताना सांगितले की, आमची एंगेजमेंट आधीच तुटली होती. यावरून आत्महत्येमागे ब्रेकअपचे कारण असल्याचे सिद्ध होत नाही. याआधीही नफिसाचे दोन ब्रेकअप झाले होते. तसेच या घटनेसाठी तिचे आई कोर्टात देखील गेले. मात्र पुरावे नसल्याने त्यांना माघार घ्यावी लागली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *