स्वतःला भूट्टाबेबी म्हणून घेणारी ही अभीनेत्री आत्ता करतेय बॉलिवुड वर राज्य; ओळखा पाहू

मुंबई| सध्याच्या घडीला कियारा अडवाणी ही अभिनेत्री आपल्या दमदार चित्रपटांनी बॉलीवूडवर राज्य करत आहे. एकापाठोपाठ एक असे हिट चित्रपट ती बॉलीवूडला देत आहे. त्यामुळे तिच्या प्रसिद्धीत अधिकच वाढ झालेली दिसते.

आजकाल सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. चित्रपटातील तिने बोललेले डायलॉग अनेकांच्या ओठी असलेले दिसत आहेत. तिचा ग्लॅमरस लूक आणि तिचे बालपणीचे फोटो देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. नुकताच तिचा एक बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे.

हा फोटो तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये तिने एक सफेद रंगाचे फॉर्क घातले आहे आणि ती मस्त मक्याचे कणीस खाताना दिसत आहे. कलाकार कितीही सुंदर असले तरी त्यांचे बालपणीचे फोटो फोटो पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

अशात कीयारा ही कबीर सिंग या चित्रपटामुळे मोठ्या प्रसिध्दी झोतात आली. यामध्ये तिने अनेक किस सीन दिले होते. त्यानंतर शेरशाह या चित्रपटात तिने कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पत्नीचे पात्र साकारले. या चित्रपटाने देखील तिला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

कियाराने सोशल मीडियावर तिच्या बालपणीच्या फोटो बरोबरच आणखीन एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती पावभाजी खाताना दिसत आहे. तसेच जुग जुग जिओ हा चित्रपट पाहत आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, “रविवारचा मूड भूट्टाबेबी”

२४ जून रोजी तिचा जुग जुग जिओ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने देखील बॉक्सऑफिसवर कमालीची कमाई केली. यामध्ये तिच्या बरोबर वरून धवल अनिल कपूर यांनी स्क्रीन शेअर केली आहे. अशात या चित्रपटाच्या कमाई बद्दल सांगायचे झाल्यास आता पर्यंत या चित्रपटाने भारतात 82.50 कोटींची कमाई केली आहे. तर परदेशात $4.6 म्हणजेच 37 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात सुरू आहे. पाचव्या शुक्रवार आणि शनिवारी या चित्रपटाने सलग 15 आणि 28 लाखांची कमाई केली आहे

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *