छोटा पडदा गाजवणारे ‘हे’ कलाकार खऱ्या आयुष्यात आहेत एकमेकांचे भाऊ बहिण

मुंबई | अभिनय क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत जे खऱ्या आयुष्यात एकमेकांचे भाऊ बहिण आहेत. तसेच ही भावा बहिणीची जोडी छोटा पडदा चांगलाच गाजवत आहेत. अशाच एका जोडीचा लहानणपणीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. अनेक जण या दोघांना ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता पर्यंत खूप कमी व्यक्ती या दोघांना ओळखू शकल्या आहेत.

तर मराठीतील छोटा पडदा गाजवणारी ही जोडी आहे शशांक केतकर आणि त्याच्या बहिणीची. शशांक हा मुरांबा या मालिकेत अक्षयच्या भूमिकेत दिसतो. त्याने त्याच्या अभिनयाने ही मालिका खूप गाजवली आहे. त्याची बहीण देखील अभिनयात सक्रिय आहे. याच दोघांचा हा फोटो व्हायरल होत आहे.

शशांकच्या बहिनेचे नाव दीक्षा केतकर आहे. दीक्षाने काही दिवसांपूर्वी तिचा आणि तिच्या भावाचा हा लहान असतानाचा फोटो शेअर केला होता. यावर तिला अनेक कमेंट आल्या होत्या. तर आता हा फोटो खूप व्हायरल होतं आहे. हा फोटो तब्बल १३ वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे साल २००९ मध्ये हा फोटो काढला गेला होता. तिने हा फोटो शेअर करत भावाला देखील टॅग केलं आहे. अनेक जण आता या फोटोचे चॅलेंज स्वीकारत आहेत. पण या दोघांना ओळखन एक मोठ आव्हान आहे.

दीक्षा ही देखील एक नावजेलेली अभिनेत्री आहे. ‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेतून तिला ब्रेक मिळाला. यामध्ये तिचा अभिनय सर्वांना आवडला. तिने न्यूयर्कमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. अभिनयाचे देखील तिने धडे घेतले आहेत. तर तिच्या भावाने म्हणजे शशांकने पुण्यातील के. डी. व्हाय. पाटील या महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.

पुढे त्याने मास्टर ऑफ इजिनिअरिंग मॅनेमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. हे पदव्युत्तर शिक्षण त्याने ऑस्ट्रेलियामधून पूर्ण केले. त्यानंतर तिथून परतल्यावर तो पुण्यातील सुदर्शन रंगमंच येथे गेला. इथे आल्यावर सचिन कुंडलकर दिग्दर्शित पूर्णविराम या नाटकात त्याने काम केलं. हे त्याचं पहिलं नाटक होतं.

‘कालाय तस्मै नम:’ ही शशांकची पहिली मराठी मालिका. त्यानंतर त्याने सुवासिनी, स्वप्नांच्या पलीकडे, फिरुनी नवी जन्मेन या मालिकांमध्ये काम केले. मात्र ‘होणार सून मी ह घरची’ या मालिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली. या मालिकेत त्याने श्रीरंग नावाच्या उद्योजकाचे पात्र साकारले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *