बॉलीवूडच्या या पाच कलाकारांचे सुरुवातीचे दिवस होते खूपच हृदय द्रावक, रस्त्यावर झोपून काढले दिवस…

दिल्ली | बॉलीवूड कलाकार आणि त्यांचे आयुष्य पाहून आपण देखील असे आयुष्य जगायला पाहिजे असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. मात्र आता पर्यंत बॉलीवूड गाजवणाऱ्या अनेक कलाकारांनी मोठ्या संघर्षाने नाव कमवले आहे. यात कुणी रस्त्यावर झोपून दिवस काढलेत तर कुणी पेन विकून दिवस काढलेत. आज या बातमीतून अशाच बिकट परिस्थितीवर मात देत पुढे आलेल्या काही कलाकारांची माहिती जाणून घेऊ.

शाहरुख खान – साल १९८८ मध्ये फौजी या मालिकेतून शाहरुखने आपल्या अभिनयाला सुरुवात केली. सुरुवातीला जेव्हा तो मुंबईमध्ये आला तेव्हा त्याला रहायला घर नव्हते. त्यामुळे त्याला यावेळी रात्री झोपण्यासाठी ऑफिसचाच आधार घ्यावा लागत होता. मात्र नंतर त्याला कंपनीचे एक घर मिळाले.

काही दिवसांनी त्याने स्वतः भाड्याने घर घेतले. त्याचे लग्न झाल्यावर देखील खूप दिवस तो भाड्याच्या घरात राहिला. मात्र नंतर त्याचे दिवस पालटले. त्याने लवकरच आपल्या कामात झेप घेत पैसा आणि प्रसिध्दी कमवली.

रजनीकांत – साऊथ आणि बॉलीवुडवर राज्य करणाऱ्या रजनीकांत यांना देखील सुरुवातीला फार हालाखीचे दिवस काढावे लागले आहेत. मात्र त्यांनी देखील आपल्या मेहनतीने मोठं नाव कमावलं आहे. चंद्रमुखी या चित्रपटाने त्यांच्या आयुष्यातला कलाटणी मिळाली. सुरुवातीला दोन वेळच्या जेवणाची देखील त्यांच्याकडे सोय नव्हती. तसच अनेक व्यक्ती त्यांचा अपमान करत होते. मात्र मनात जिद्द कायम होती. त्यामुळेच आज ते एक प्रसिद्ध सुपरस्टार आहेत.

अनुष्का शर्मा – अनुष्काने वयाच्या १५ व्या वर्षी पहिली ऑडिशन दिली होती. यावेळी तिला रिजेक्ट केले गेले होते. तिने रब ने बना दी जोडी या चित्रपटातून पहिली एन्ट्री केली. यात तिने शाहरुख बरोबर काम केले. मात्र तिने देखील सुरुवातीला खूप संघर्ष केला. मात्र आज ती बॉलीवूड गाजवत आहे. विराट कोहली बरोबर लग्न केल्या नंतर या दोघांना आता एक बाळ देखील आहे. त्यांच्या मुलीचे नाव वामिका आहे.

मिथुन चक्रवर्ती – फुटपाथवर आपलं आयुष्य घालवून मिथुनने नंतर अभिनय क्षेत्रात नाव कमवन्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने डिस्को डान्सर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याचा हा पहिलाच चित्रपट खूप गाजला. या नंतर त्याच्या समोर अनेक चित्रपटांची रांग लागली.

प्रियांका चोप्रा – आज या अभिनेत्रीने बॉलीवूड बरोबर हॉलीवूड देखील गाजवले आहे. मात्र सुरुवातीला तिला अनेक चित्रपटांमधून काढून टाकले होते. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, मला सुरुवातीला खूप डावलले जात होते. यावेळी मी चित्रपटाचा काही भाग शूट केल्या नंतर अनेकांनी माझे काम दुसऱ्या अभिनेत्रींना दिले होते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *