हिंदी मालिकेतील या अभिनेत्र्या अचानक झाल्या गायब; आता करतात ही कामे

मुंबई | हिंदी मालिकासृष्टीन बॉलिवूडला अनेक कलाकार दिले आहेत. यात सुशांत सिंग राजपूतसारखा उत्कृष्ट नट आज आपल्यात नाहीये. पण अशी अनेक उदाहरण आहेत. गेली अनेक वर्षांपासून हिंदी मालिका विश्वात काहीना काही घडतच असायचं. याआधी बरेच वर्षे ‘ सास भी कभी बहू थी ‘ कुसुम सारख्या हिंदी मालिका पूर्वी फारच प्रसिद्ध होत्या.

याच मालिकेतील कशी कलाकार चित्रपटात वगैरे पहायला मिळतात. पण काही कलाकार काम मिळत नसल्यानं निराश आहेत. बेपनाह प्यार मालिकेत झलकलेली अभिनेत्री एकता शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या एकता शर्मा तिच्या आईसोबत मुंबईत भाड्याच्या घरात राहत आहे. एकताने सांगितले की, कोरोना महामारीमुळ तिच्यावर वाईट दिवस आले होते.

एकता शर्मावर कॉल सेंटरवर काम करायची आली वेळ – ही अभिनेत्री ‘बेपनाह प्यार’ या मालिकेत काम करायची. 2020 च्या कोरोना महमारीन काम मिळत नव्हती. या काळात घर चालवण्यासाठी तीन कॉल सेंटरमध्ये देखील काम केलं. मुलाखतीत एकता शर्मा म्हणते, ‘मला अभिनयाच्या ऑफर्स मिळत नव्हत्या. मी खूप संघर्ष केला. मी घरी बसून वाट पाहत होते की मला काही चांगली संधी मिळेल का? मला माझे काम आवडते आणि मला अभिनय क्षेत्रात पुन्हा पदार्पण करायचे आहे. मी सतत लुक टेस्ट आणि ऑडिशन देत असते.

रिपोर्ट्सनुसार, एकताने 2009 मध्ये अनिल दोंदे नावाच्या व्यावसायिकाशी लग्न केले होते. 2014 मध्ये त्यांना मुलगी झाली. परंतु काहीच दिवसांत त्यांच्यामध्ये गोष्टी खराब होत गेल्या आणि ते वेगळे झाले. अभिनयात काम नसल्यामुळे एकता शर्माला कॉल सेंटरमध्ये जावे लागले. याबाबत ती म्हणाली, ‘कॉल सेंटरमध्ये काम करणे ही वाईट गोष्ट नाही.

मी माझी सेल्फ रिस्पेक्ट न विकता हे काम केले. कोणतेही काम लहान-मोठे नसते. दोन दशके टीव्हीमध्ये काम करूनही आज मला काम मिळत नाही हे खूप वाईट आहे.’ ती पुढे म्हणाली, ‘मी माझ्या दिवंगत वडिलांची आभारी आहे, ज्यांनी मला अभिनयात जाण्यापूर्वी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यास सांगितले. त्यांच्या सल्ल्याने मी माझे शिक्षण पूर्ण केले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *