पाचशे रुपयांवरून वाद पडला भारी; तरुणाने गमावला जीव, वाचून धक्काच बसेल

विरार | नवरा बायकोच्या नात्यात काहीना काही वादामुळ भांडण झाली आहेत यामुळं त्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. पण नवऱ्यानं आपल्या बायकोची मस्करी करण्याच्या नादात स्वतःची कुस्करी केली. सोमवारी ही घटना घडली. पत्नीला घाबरवताना पतीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पतीचं वय 35 वर्षे होतं. आपल्या बायकोची मस्करी करण्यासाठी त्यान सहज गळफास लावण्याच नाटक केलं. परंतु गळ्याला गळफास बसला आणि पतीचा मृत्यू झाला.

सहा दिवसांपूर्वी दाम्पत्य विरारमध्ये राहण्यास आलं होतं. भगवान रामजी शर्मा भाईंदर येथील कपडा निर्मितीच्या कारखान्यात काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान यांनी त्यांची 26 वर्षीय पत्नी चांदनीदेवीला कपडे खरेदी करण्यासाठी 2 हजार रुपये दिले होते. त्यावेळी पत्नीनं 500 रुपये परत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र तिनं 500 रुपये परत केले नाहीत. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

पाचशे रुपये परत न केल्यास मी आत्महत्या करेल अस भगवान यांनी आपल्या बायकोची चेष्टा केली. म्हणून ते आपल्या बेडरूममध्ये गेले ओढणी बांधून फास तयार केला. दरवाजा बंद होता अशावेळी मी फास घेतोय अस बायकोला सांगितलं. गळ्याला फास बसल्याचा अभिनय देखील केला. परंतु खराखुरा फास बसला. इतक्यात पत्निन शेजारच्या बोलवलं. त्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडला. पाहतो तर काय पतीन गळफास घेतला होता. त्यांना लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तो पर्यंत मृत्यू झाला होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *