मावशीला धक्का देऊन तरुणान नदीत मारली उडी; पुढे जे घडलं ते पाहून धक्काच बसेल

धुळे | धुळे शहरातील कालीका माता मंदिराच्या बाजूला असलेल्या फरशी पुलावरुन बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका 30 वर्षीय तरुणाने नैराश्यातून पांझरा नदीत उडी घेतल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तरुणाच्या नातलग आणि मित्रांनी फरशी पुलावर एकच गर्दी केली होती.

रोहित प्रदीप बोरसे अस तरुणाच नाव होत. तो धुळे शहरातील गरुड कॉलनी देवपूर येथे आपल्या मावशी सोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याची प्राथमिक माहिती त्याच्या मित्रांनी दिली. काही दिवसांपासून रोहित नैराश्‍याच्या गर्तेत होता असे त्याचे मित्र सांगतात. त्यान काल सकाळी पांझरा नदीचा गणपतीपूल गाठेपर्यंत मित्र धावपळ करत घटनास्थळी आले. तोपर्यंत रोहितने पांझरा नदीत उडी घेतली होती.

काल सकाळी त्याचा भाऊ आणि मावशी नाशिकहून रोहितला घेऊन जाण्यासाठी धुळ्यात आले होते. तो तीन ते चार दिवस घरातून बेपत्ता होता. रोहित बोरसे हा उच्च शिक्षित असून स्पर्धा परीक्षांची तयारी देखील करत होता. त्याने घरात कोणालाही न जुमानता त्याच्या मावशीला जोरदार धक्का देत घराबाहेर पळ काढला.

रोहित बोरसे याचे हे रूप बघून घरातील सर्वाना धक्का बसला व ते देखील त्याच्यामागे धावत सुटले त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणाचे एकही ऐकले नाही. त्यानंतर त्याने थेट पांझरा नदीमध्ये उडी घेतली. यावेळी त्याला वाचवण्याचा प्रयत्न स्थानिक पोहणाऱ्यांनी केला मात्र रोहित सापडला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना व मनपाला देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनाची देवदूत हे वाहन घटनास्थळी दाखल झाले.

बराच वेळ स्थानिक होणाऱ्या मुलांनी रोहितचा शोध घेतला. मात्र रोहित मिळून आला नाही. त्यामुळे रोहितच्या नातेवाईकांनी पोलीस प्रशासन तसेच मनपा प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे रोहितला वाचवता आले नाही असा आरोप रोहितच्या घरच्यांनी केला. गुरुवारी सकाळच्या सुमारास रोहित याचा मृतदेह तब्बल २४ तासांनी पांझरा नदीवरील मोठा पुलाच्या खाली आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर रोहितच्या घरच्यांनी या संदर्भात माहिती देण्यात आली.

जिल्हा प्रशासनाचा कामचुकार कारभार : या सर्व घटनेदरम्यान नागरिकांमध्ये व सोशल मीडियावर जिल्हा प्रशासनाच्या या कामचुकार कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. धुळे मनपा, आपत्ती व्यवस्थापन तसेच जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी या घटनेची दखल घेतली असती तर कदाचित रोहितला वाचवता आलं असतं, असे म्हणत जिल्हा प्रशासनाच्या या कारभारावर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *