आपल्या पतीला दुसऱ्या अभिनेत्री बरोबर पाहून भडकली पत्नी, आणि मग कुटून काढली नवऱ्याची बायको

मुंबई | कलाकार आणि त्यांच्या प्रेम कहाण्या या नेहमीच चर्चेचा विषय असतात. अगदी हाताच्या बोटावर मोजावे इतकेच कलाकार सिनेसृष्टीमध्ये एकाच साथीदाराबरोबर आयुष्य घालवत आहेत. सिनेसृष्टी असे बहुसंख्य कलाकार आहेत ज्यांनी विवाहबाह्य संबंध ठेवलेले आहेत. अशात ज्यावेळी हे संबंध पत्नीला समजतात त्यावेळी निश्चितच पतीची बेदम धुलाई होते. आपल्या भारताच्या संस्कृतीमध्ये या सर्व प्रकारांना मान्यता नाही.

कोणत्याही पत्नीने आपल्या पतीला इतर कोणत्या मुलीबरोबर पाहिले तर तिला राग येणे स्वाभाविकच आहे. मात्र विचारपूस न करता कोणत्याही घटनेची शहानिशा न करता घेतलेला निर्णय नेहमीच चुकीचा ठरतो. असाच एक प्रकार हिंदी सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्री बरोबर घडला आहे.

अभिनेत्री प्रकृती मिश्रा हिला एका महिलेने तिच्या पतीबरोबर पाहिलं. त्यामुळे त्या महिलेने पतीला सोडून त्या अभिनेत्रीलाच मारहाण सुरू केली. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवरती वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

नेमकं या व्हिडिओमध्ये काय आहे हे जाणून घेऊ. अभिनेत्री प्रकृती मिश्रा आणि अभिनेता बाबूशान उत्कल हे दोघे एका चार चाकी गाडीमध्ये बसले होते. यावेळी अभिनेत्याची पत्नी तिथे आली. तिने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेबरोबर बसलेले पाहिले. यावेळी ती खूप संतापली. त्यानंतर तिने अभिनेत्रीला बेदम मारहाण सुरू केली. मात्र अभिनेत्रीने कसाबसा जीव वाचवत तिथून पळ काढला.

संपूर्ण प्रकरणी प्रकृती मिश्राने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली आहे की, ” मी आणि बाबूशान एकत्र एका कार्यक्रमाला निघालो होतो. यावेळी आम्ही दोघे गाडीत बसलो. त्यावेळी समोरून बाबूशानची पत्नी काही गुंडांबरोबर आली. तिने तिथे येऊन मला काहीही न विचारता सरळ मला मारहाण सुरू केली. तिने केलेला हा प्रकार फार चुकीचा आहे.”

तसेच या प्रकरणी अभिनेत्याने देखील स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटलं आहे की, ” माझे कुटुंबीय माध्यमांवर येत असलेला अफवांवरती एवढा विश्वास ठेवतात हे मला माहीत नव्हतं. जर माझ्या पत्नीला प्रकृती मिश्रा बरोबर मी काम करायला नको असेल तर मी तिच्याबरोबर काम करणार नाही.”

अशात अभिनेत्री प्रकृती मिश्रा बद्दल सांगायचे झाल्यास ती एक प्रतिभान अभिनेत्री आहे. तिच्या उत्तम अभिनयामुळे तिला काही पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. बीट्टी बिजनेस वाली या मालिकेमध्ये तिने अभिनय केला होता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *