दोन जिवलग मित्राचा दुर्दैवी अंत; नीट क्लासला जात असताना…

औरंगाबाद | वाहन अपघातात मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्या सतत वाढत आहे. यामध्ये जास्तकरून तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू होतं असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे. औरंगाबादमध्ये देखील असाच एक काळीज सुन्न करणारा प्रकार घडला आहे. यात दोन १९ वर्षीय तरुण मुलांनी आपला जीव गमावला आहे.

नीट क्लाससाठी औरंगाबादला निघालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दुचाकी एक ट्रकला पाठीमागून धडकली. यावेळी ही दुचाकी खूप भरधाव वेगात होती.
यात दोघेही जागीच ठार झाले आहेत. बुधवारी सकाळी भेंडाळा फाट्याजवळ या मुलांच्या गाडीचा अपघात झाला. गंगापूर तालुक्याचे रहिवासी असलेल्या मुलांची नावं आदित्य रामनाथ सुंब (१९) यश नयन शेंगुळे (१९) अशी आहेत.

यश व आदित्य हे दोघे एकत्र एकाच वर्गत शिकत होते. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ते नीट परीक्षेचा अभ्यास करत होते. हे दोघांनी आधी एकदा नीटची परीक्षा दिली होती. मात्र यात त्यांना यश आले नव्हते. त्यामुळे दोघेही रिपीट बॅचमध्ये होते. या याच परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी औरंगाबाद येथे क्लास लावला होता. पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी (एमएच २० ईएक्स ६०४८) गावातून निघाली.

सकाळी पावणेसहाच्या सुमारास औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकला (केए ५६-४१२३) या दुचाकीची पाठीमागून जोरात धडक बसली. गाडीचा वेग खूप जास्त असल्याने दोघेही खाली फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला मार लागला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर फार गर्दी नव्हती. या घटनेत दोन्ही मुलांचा जागीच जीव गेला आहे.

आदित्य आणि यश या दोघांचे देखील एकच स्वप्न होते. नीट परीक्षा पास करून वैद्यकीय शिक्षण घेण्याची त्यांच्या मनात जिद्द होती. मात्र त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. आता दोघेही या जगात नाहीत. एकाच गावातील हे दोन्हीही युवक गेल्याने गावात शोककळा पसरली आहे. सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *