मालिका विश्व हादरलं ! वाढदिवस झाला आणि

मालिका विश्व हादरलं ! वाढदिवस झाला आण ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप
Nishi Singh : गेल्या दोन ते दीड वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक कलाकार हे आपल्याला सोडून गेल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेक कलाकारांचा समावेश आहे. गान कोकिळा लता मंगेशकर यांच्यापासून काल-परवापर्यंतच्या केके यांचा देखील समावेश आहे.

 

के के यांचे देखील धक्कादायक रित्या निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी हळूहळू व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार देखील याच कालावधीत आपल्याला सोडून गेलेले आहेत. यामध्ये अनेक कलाकारांचा देखील समावेश आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच असा एका ज्येष्ठ अभिनेत्रीचा देखील मृत्यू झाला आहे.

या अभिनेत्रीने देखील अनेक मालिका आणि चित्रपटात यापूर्वी काम केले होते. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाची जादू देखील खूप चालवली होती. त्याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर अनेक लोकप्रिय भूमिका केल्या होत्या. या अभिनेत्रीचे नाव निशी सिंह असे आहे. निशी सिंह यांनी वयाच्या 50 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.


या घटनामुळे मालिका विश्वामध्ये खूपच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. निशी सिंह यांनी हिटलर दीदी, कबूल है, इश्कबाज, तेनाली रामा यासारख्या लोकप्रिय मालिकात आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली होती. आता या अभिनेत्रीचे निधन झाले आहे. निशी सिंह या अशाप्रकारे सोडून गेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
अभिनेत्री निशी सिंह यांना मे महिन्यात पक्षघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ही खराब होत गेली. यातच त्यांना घशाचाही आजार झाला होता. तसेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना खाता येणे देखील अवघड झाले होते. त्यामुळे त्यांना लिक्विड पद्धतीने जेवण देण्यात येत होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यानंतर त्यांचे निधन झाले. 16 सप्टेंबर रोजी निशी सिंह यांनी आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. ही माहिती त्यांचे पती लेखक अभिनेते संजय सिंह भादली यांनी दिली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *