नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मनोरंजन | मराठीच नाही तर हिंदी चित्रपसृष्टीतही नागराज मंजुळे यांनी आपल्या सर्वगुणांचा वापर करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी नागराज मंजुळे यांनी अभिनय आणि प्रॉड्युस केलेल्या नाळ या सिनेमाचा दुसरा देखील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समजत आहे. पहिल्या भागात चैत्याच्या अभिनयामुळ चाहत्यांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली.

पोस्टमध्ये त्यांनी नाल चित्रपटातील स्टारकास्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ‘नाळ 2’च्या नावानं चांगभलं अस म्हणत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सैराट आणि झुंड या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर सुधाकर रेड्डी यांकट्टी हे करणार आहेत. नाळ या सिनेमासाठी सुधाकर यांना बेस्ट डेब्यू डायरेक्टर आणि श्रीनिवास पोकळे याला बेस्ट चाईल्ड ॲक्टर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 14 कोटींपर्यंत या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर कल्ला केला.

काय म्हणाले नागराज : ‘मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकवायला कधी भेटुयात? नाळचा दुसरा भाग काय होऊ शकतो, याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की, दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं. पहिल्या ‘नाळ’ प्रमाणेच ‘नाळ’चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे! ‘नाळ 2’ नावानं चांगभलं!!!’, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *