या देशाच्या पंतप्रधानांनी दारू पिऊन केला धिंगाणा; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दिल्ली | पंतप्रधान हे देशाचे नागरिक आणि प्रमुख असतात. देशाचे प्रतिनिधत्व करत असताना ते एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे काम करत असतात. संपूर्ण देश त्यांच्याकडे एका आधाराच्या नजरेने पाहत असतो. पंतप्रधान हा आपल्या देशाचे नाव आणि प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. अशात आता एका महिला पंतप्रधानाने सर्वांना चकित करणारे एक काम केलं आहे. एका देशाच्या महिला पंतप्रधान असलेल्या त्या महिलेने चक्क दारू पिऊन पार्टीत धिंगाणा घातला आहे.

याबाबतचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. अनेक जण या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. फनलँड या देशाच्या पंतप्रधान महिलेने हा पराक्रम केला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत. तसेच त्या देशातील अनेक नागरिक देखील त्यांच्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

सना मरीन असे त्या महिला पंतप्रधानांचे नाव आहे. त्या फनलँड या देशाचे पंतप्रधान म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. या जगातील सर्वात तरुण महिला पंतप्रधान असलेल्या त्या प्रथमच आहेत. नुकत्याच त्या त्यांच्या एका मैत्रिणीच्या इथे पार्टीला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी दारू पिली तसेच गाण्यांच्या तालावर त्या नाचत देखील होत्या. त्यांच्या बरोबर असलेल्या एका व्यक्तीने त्यांचा व्हडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ @visegrad२४ या अकाउंटवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमुळे आता अनेक व्यक्ती आणि विरोधक त्यांची ड्रग्ज टेस्ट करण्याची मागणी करत आहेत. गेल्या वर्षी देखील त्यांच्याकडून अशीच एक चूक घडली होती. त्यावेळी त्यांना माफी देखील मागावी लागली होती. त्या गेल्या वर्षी एका क्लबमध्ये गेल्या होत्या. इथे त्यांचा संपर्क एका कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती बरोबर आला होता. त्यामुळे त्यांनी माफी मागितली होती.

आता पुन्हा एकदा दारू पिऊन पार्टी केल्याने अनेक व्यक्ती त्यांच्यावर टीका करत आहेत. या सर्वांबाबत त्यांनी आपले मत स्पष्ट करत म्हटले आहे की, “देशाच्या कामांमधून ज्यावेळी मी स्वतःसाठी वेळ देत असते त्यावेळी मी अशाच पद्धतीने एन्जॉय करते, माझं खाजगी आणि कामाचं आयुष्य वेगळं आहे. मी आधीही अशीच होते आणि आताही अशीच राहील मी माझ्यात काही बदल करणार नाही कारण यात मला चुकीचे काहीच वाटत नाही. ” असे त्या म्हणाल्या.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *