सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार “गोष्ट एका पैठणीची” ला जाहीर….

मुंबई| गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सर्व काही ठप्प झाले होते. सर्व क्षेत्रांप्रमाणे अभिनय क्षेत्रात देखील याचा जोरदार फटका बसला. अशात आता सर्व काही सुरू असताना यंदा चित्रपट सृष्टीतील मनाच्या राष्ट्रीय पुस्करांची घोषणा झाली आहे. यंदा अनेक कलाकारांनी हे पुरस्कार मिळवले आहेत.

यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनय, सर्वोत्कृष्ट चित्रपट असे अनेक पुरस्कार आहेत. त्यातील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मान ” गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाला मिळाला आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर या दोघांची यामध्ये प्रमुख भूमिका आहे. शांतनू रोडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी मोठी धडपड करतात. अशात काहींची स्वप्न खूप मोठी असतात. तर काहींची स्वप्न अगदी लहान असतात. मात्र ही छोटी स्वप्न पूर्ण करताना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र संघर्ष आणि मेहनत कायम असेल तर यश मिळतेच. त्यामुळेच हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्री साठी जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येक स्त्रिच्या अलंकारांमधील पैठणी हे एक मोठं लेन आहे. त्यामुळे प्रत्येकच महिलेला पैठणी हवी असते. अशात एक स्त्री ही एक पैठणी मिळवण्यासाठी खूप मेहनत करते. तिची जिद्द चिकाटी या चित्रपटात दाखवली आहे. तसेच कुटुंब आणि त्यातील वाद अडचणी आणि मायेचा नात्यांचा ओलावा देखील चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *