नागा चैतनच्या त्या लिस्टमध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींची नावे आहेत सामील, लिस्ट वाचून व्हाल थक्क….

मुंबई | नागा चैतन या अभिनेत्याने आजवर दाक्षिणात्य सिने सृष्टीमध्ये मोठे नाव कमावले आहे. त्याचा अभिनय अगदी दांडगा आहे. आजवर त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर लाखोंचा चाहता वर्ग कमवला आहे. अशात आता एका शो मध्ये त्याने त्याच्या मनातली एक इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा ऐकून तुम्ही देखील चकित व्हाल.

बॉलिवूड मधील सर्वच अभिनेत्री या दिसायला खूप सुंदर आहेत. यातील अनेक अभिनेत्री लाखो तरुणांच्या क्रश आहे. या अभिनेत्रींबरोबर एक तरी रोल करता यावा असे प्रत्येक स्ट्रगलर कलाकाराला वाटत असेल. अशात नागाला देखील त्याला बॉलीवुड मधील कोणत्या अभिनेत्री बरोबर काम करायला आवडेल असे एका मुलाखतीत विचारण्यात आले होते. त्यावेळी त्याने बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्रींच्या नावाचा चक्क पाढाच वाचला. त्याने यामध्ये कॅटरिना कैफ पासून ते अगदी आलिया भट्ट पर्यंत अनेक अभिनेत्रींबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

यावेळी त्याने करीना कपूर, प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण अशा अनेक अभिनेत्रींची नावे घेतली. त्याची ही मोठी लिस्ट ऐकून सगळेच चकित झाले. यावेळी त्याने सुष्मिता सेन ही त्याची पहिली क्रश असल्याचे देखील तो म्हणाला. ती जर मला कधी भेटली तर मी तिला ही गोष्ट नक्की सांगेल असे तो यावेळी म्हणाला.

तसेच पुढे तो म्हणाला की, आलिया भट्टचा अभिनय खूप छान आहे. त्यामुळे मला ती खूप आवडते. प्रियांका देखील दमदार अभिनय करते मला तिच्या बरोबर स्क्रीन शेअर करण्याची इच्छा आहे. तसेच यावेळी करीनाचे कौतुक करायला देखील तो विसरला नाही. पुढे त्याने हे देखील सांगितले की, बॉलीवुडमधील आवडत्या अभिनेत्रींची लिस्ट फार मोठी आहे. सगळी नावे मी आताच सांगू शकत नाही.

नागाने लाल सिंग चढ्ढा या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. यात आमिर खान बरोबर त्याने दमदार अभिनय केला आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितकासा गाजला नाही. हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा लाल सिंग चढ्ढा हा रिमेक आहे. यामध्ये करीनाने देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

समंथा बरोबर घटस्फोट घेतल्यानंतर नागा खूप चर्चेत होता. या दोघांच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का होता. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मीका मंदाना बरोबर तो ऑन स्क्रीन रोमान्स करताना दिसेल अशी चर्चा रंगली होती. मात्र या बाबत अधिक माहिती मिळालेली नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *