जवळ असलेला पैसा संपला, दारिद्र्यामुळे भीक मागावी लागली, किडे पडून मेली ही प्रसिध्द अभिनेत्री ….

मुंबई| चित्रपटसृष्टीत जशी चकाकी आहे तसाच अंधारही आहे. सिनेविश्वात अशा कलाकारांची अनेक उदाहरणे आहेत, ज्यांना सुरुवातीला खूप यश मिळाले पण नंतर ते अंधारात आणि दारिद्र्यात विलीन झाले. याच कारणामुळे अनेक कलाकारांचे आयुष्य खराब झाले. यातील काही कलाकारांचा मृत्यू इतका भयानक पद्धतीने झाला की, त्यांची कहाणी ऐकून काळीज हादरेल. आज ८० च्या दशकातील अशाच एका अभिनेत्रीची माहिती जाणून घेणार आहोत, जिचा अंत पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील.

आज आपण जाणून घेणार आहोत ८० च्या दशकातील अभिनेत्री निशा नूर बद्दल. निशाने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर कमी कालावधीतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीत एक विशेष स्थान मिळवले होते. असे म्हटले जाते की, त्यावेळी दक्षिण भारतातील प्रत्येक दिग्दर्शकाला निशासोबत चित्रपट बनवायचा होता. अभिनेत्रीने तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले होते. तिने बॉलीवूडमध्ये देखील दमदार अभिनय केला. मात्र तिचा शेवट खूप भयानक पद्धतीने झाला.

सुरुवातीला प्रचंड प्रसिद्धी मिळाल्यावर काही काळाने तिला चित्रपट मिळणे बंद झाले. प्रसिद्धीच्या काळात तिला अनेक व्यसने लागली होती. मात्र नंतर काम नसल्यामुळे तिच्याकडे असलेले सर्व पैसे संपले होते. त्यामुळे ती घर विकून भाड्याच्या घरात राहत होती. नंतर तिच्याकडे भाडे भरण्याठी देखील पैसे नव्हते. त्यामुळे ती रस्त्यावर भिक मागून पोट भरत होती.

2007 मध्ये निशा दर्ग्याच्या बाहेर अत्यंत वाईट अवस्थेत सापडली होती. तिला पाहून तिला ओळखणे कठीण झाले होते. तिचे शरीर खूपच जीर्ण झाले होते. तिच्या अंगावर किडे रेंगाळत होते. त्यामुळे तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तपासात तिला एड्स झाल्याचे समोर आले. 23 एप्रिल 2007 रोजी निशा या आजाराशी लढत हरली आणि जगाचा निरोप घेतला. ज्यावेळी तिला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा तिची खरी ओळख समजली होती.

निशा तरुण असताना आणि तिच्याकडे पैसा असताना तिचे अनेक कलाकारांबरोबर संबंध असल्याचे म्हटले जाते. त्या मुळेच तिला एड्स झाला होता. तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीत तिचे नाव अनेक नामवंत कलाकारांबरोबर जोडले गेले होते. मात्र तिच्याशी कोणीही लग्न केले नाही. आयुष्यात असलेल्या एकटेपणामुळे तिच्यावर अशी वेळ आली असं देखील अनेक जण म्हणतात.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *