हॉटेलमध्ये केलेली ती चूक पडली महागात, आणि विवेकाचा ऐश्वर्या सोबत झाला ब्रेकअप

दिल्ली | प्रेमा प्रमाणेच प्रत्येकाच्या ब्रेकअपची कहाणी देखील रंजक असते. अशात बॉलिवुड कलाकारांचे ब्रेकअप म्हटल की, आणखीनच इंटरेस्टिंग गोष्ट. अनेक कलाकार आपल्या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एकत्र येतात. पुढे प्रेमात पडतात आणि मग नंतर सुरू होतात भांडण आणि मग होतो ब्रेकअप.

आता आज आपण बॉलीवूडच्या एका सुंदर अभिनेत्रीच्या ब्रेकअपची कहाणी जाणून घेणार आहोत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन आहे. ऐश्वर्या सुरुवातीपासून अभिनयात उत्तम होती. शिवाय ती दिसायला अफाट सुंदर असल्याने प्रत्येक अभिनेत्याला ती आवडत होती. नव्वदच्या दशकातील ती एक ड्रीम गर्ल होती असं म्हणायला हरकत नाही.

अनेकांच्या दिलाची धडकन असलेली ऐश्वर्याच्या प्रेमात सलमान खान सुद्धा वेडा झाला होता. या दोघांच्या रिलेशशिपमध्ये दोघेही सतत माध्यमांवर झळकत होते. शिवाय या दोघांचा ब्रेकअप का झाला हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. सलमान खूप रागीट स्वभावाचा असल्याने तो तिला खूप त्रास देत होता. त्यामुळे तिने त्याला सोडून दिलं होतं. सलमान नंतर तिचं नाव विवेक ओबेरॉय बरोबर जोडलं जातं होत. या दोघांनी देखील माध्यम खूप गाजवली. या दोघांच्या प्रेमाची चर्चा खूप रंगली होती.

विवेक ऐश्वर्यावर जीवापाड प्रेम करत होता. मात्र प्रेमात गोडवा असेल तर ते टिकत नाही तर त्याची मती होते. प्रेम मनात असावं ते डोक्यात गेलं की, सगळाच खेळ संपतो. असच काहीस या दोघांच्या प्रेमाच्या बाबतीत झालं. विवेकने प्रेमाखातर असा काही पराक्रम केला की, सगळीकडे त्याच्यावर टीका झाली. तसेच ऐश्वर्याला त्याला कायमचे गमवावे लागले. त्याने चक्क हॉटेलच्या रूमवर पत्रकारांना बोलावले. त्याची ही वागणूक खूपच खालच्या दर्जाची होती. त्यावेळी नेमक काय झालं होतं हे सविस्तर जाणून घेऊ.

तर मंडळी त्या दिवशी विवेक आणि ऐश्वर्या एका हॉटेल मधील रूमवर होते. त्यावेळी विवेकने तिला ऐश्वर्याला न सांगता तिथल्या रूमवर पत्रकार परिषद बोलवली. पत्रकार आल्यावर तो म्हणाला की, सलमान ने मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. आता हा सर्व प्रकार रीतसर तक्रार करून सांगता आला असता.

मात्र तक्रारीची जागा आणि वेळ गंडली. त्याचा परिणाम असा झाला की, ऐश्वर्याला यामुळे खूप त्रास झाला. माध्यमांना तोंड देता देता तिच्या नाकी नऊ आले. नंतर तिच्या मनातून तो पूर्णतः उतरला. त्यामुळे या दोघांचे ब्रेकअप झाले.

त्यानंतर तिने अभिषेक बच्चन बरोबर विवाह केला. आता ती तिच्या संसारात सुखी आहे. तिला आराध्या नावाची एक मुलगी देखील आहे. लग्ना नंतर ती चित्रपटापासून थोडी दूर गेली आहे. सध्या आरध्याला व्यवस्थित सांभाळणे हे तिच्यासाठी महत्त्वाचे काम आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *