प्रियकर म्हणाला तू चालू बाई आहे; म्हणून प्रेयसीने गळा चिरून केली त्याची हत्या

दिल्ली | प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. मात्र एका प्रेयसीनं आपल्या प्रियकराचा गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अनेक दिवसांपासून ही महिला विवाहित असून देखील आपल्या पतीला सोडून प्रियकराबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र तिने आता याच प्रियकराचा खात्मा केला आहे.

गाझियाबाद येथील टीला मोड या ठिकाणी एक महिला आपल्या प्रियकराबरोबर राहत होती. तिने तिच्या प्रिकराचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्याचे शव बॅगमध्ये भरून ही महिला चालली होती. रात्रीची वेळ होती. त्यावेळी पोलीस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभे होते.

या महिलेने पोलीस आहे हे पाहताच घाईत रस्ता बदलण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना तिचा दाट संशय आला. त्यामुळे त्यांनी तिला रोखले आणि तिची विचारपूस सुरू केली. यावेळी तिची बॅग तपासली असता त्यात पोलिसांना एका व्यक्तीचे शव सोडले. यावेळी महिलेला ताब्यात घेतले गेले.

तिची अधिक चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की, मी प्रीती शर्मा आहे आणि माझ्या पतीचे नाव दीपक यादव असे सांगितले. हे दोघे तुलसी निकेतन येथे राहत होते. महिलेने पुढे सांगितले की, मी गेल्या ३ ते ४ वर्षांपासून फिरोज बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आम्ही एकत्र राहत होतो. मी सतत त्याला लग्न विषयी विचारायचे मत्र तो नेहमी उडवाउडवीची उत्तरे देत होता.

या मुद्द्यावरून आमच्यात शनिवार आणि रविवारी खूप भांडण झाले. त्यावेळी तो मला म्हणाला की, तू एक चालू बाई आहेस. तू तुझ्या नवऱ्याची नाही होऊ शकली तर माझी कशी होशील. यावर तिला राग आला आणि घरात असलेल्या वस्तर्याने तिने फिरिजचा गळा चिरून त्याची हत्या केली.

महिला पुढे म्हणाली की, मी त्याचे शव बॅगमध्ये भरले. रात्रीच्या अंधारात मी त्याचे शव रेल्वे रुळावर टाकणार होते. प्रीती ही दिल्लीत हेअर कटिंगचे काम करत होती. नात्यातील भांडणामुळे तिने आपल्याच प्रियकराचा जीव घेतला. सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *