शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच…; अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टने उडाली एकच खळबळ!

कॉमेडीचा परफेक्ट टायमिंग साधून कुशल बद्रिकेने(kushal badrike) प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच त्याला कुटुंबियांकडून खंबीर साथ आहे.

 

कुशल सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. यावर तो सतत त्याचे फोटो, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. सध्या कुशलने एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून चाहते चिंतेत आहेत.

कुशल बद्रिकेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले आहे. ज्यात त्याने लिहिले आहे की,

 

 

“मी एकट्याने कधीच चित्रपट पाहिला नाही, इंटरव्हल, मधला समोसा आणि पोपकोर्न शेअर करण्यात चित्रपटापेक्षा जास्त मज्जा आहे असं मला नेहमी वाटत.

 

 

एकटाच असा hotel मद्धे जाऊन मी कधी जेवलेलो नाही, मला काय order करावं हेच सुचत नाही , तसंच एकट्याने प्रवास करायला सुद्धा मला आवडत नाही, कदाचित मला माझ्याच सोबत खुप बोर होत असावं.

 

पण आज सिनेमाच्या shooting साठी एकट london ला जावं लागतय, international प्रवासात, पृथ्वी चा व्यास ओलांडताना घड्याळाचा तासही बदलतो ही गोष्ट मला अजूनही जादुई वाटते.

 

खिडकीतून दिसणारे ढग, ढगांच्या चाळणीतून दिसणारा समुद्र, त्यातुन डोकावणारा सुर्यप्रकाश अवेळी रात्र ह्या सगळ्यात कुणीतरी गप्पा मारणार हव यार .

पण आयुष्याच्या प्रवासात शेवटा पर्यंत आपल्याला साथ करणारे फक्त आपणच असतो, काही लोक हाथ सोडवून घेतात तर काहींचे हाथ आपल्या हातून अलगद सुटतात, शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच करावा लागतो.

मग एखादा विमान प्रवास एकट्याने करायला काय हरकत आहे, पण तरीही वाटतं…. किमान international travel मधे आपल्या वाट्याचे 2 पेग प्यायला तरी कुणी हव होत…. Happy journey,To me”. या पोस्टनंतर हे प्रखरपणे दिसतंय की, अभिनेता लंडनला शूटिंगसाठी एकटा जातोय त्यामुळे तो नाराज दिसत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *