फोटो दिसत असलेली निरागस चिमुकली आज आहे बॉलीवूडची ड्रामा क्वीन

मुंबई | सध्या अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांचे बालपणीचे फोटो शेअर करत आहेत. शाहरुख खान, सलमान खान, क्रिती सेनन, प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण, आलिया भट, रणबीर कपूर, रणवीर सिंग अशा अनेक कलाकारांनी त्यांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.

यासह अनेक विनोदी कलाकाराने देखील आपल्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यांचे फोटो पाहून चाहते खूप खुश आहेत. सर्व कलाकार आपल्या बालपणीचे फोटो शेअर करत आहेत हे पाहिल्यावर मग बॉलीवूडची आयटम गर्ल गप्प कशी बसेल. तिने देखील आपल्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये तिने केशरी रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच यावरती तिने केस मोकळे सोडले आहेत. हा फोटो साधारणता तीन वर्षांच्या चिमुकलीचा आहे. मात्र तेव्हा देखील या अभिनेत्रीचे केस किती लांब सडक होते हे पहा. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाबरोबरच आपल्या स्वभावामुळे स्वतःला अनेक वेगवेगळी विशेषणे जोडून घेतली आहेत. तिला कोणी ड्रामा क्वीन म्हणतात तर कुणी आयटम गर्ल तर कुणी आणखीन काही अशी अनेक नाव असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. फोटोत दिसत असलेली निरागस चिमुकली ही राखी सावंत आहे. आज तिने बॉलीवूड मध्ये मोठा धुमाकूळ घातला आहे.

राखी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. तिने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. साल 1997 मध्ये तिने अग्निचक्र या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटातील तिचा अभिनय पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं. त्यानंतर तिने परदेसिया, ड्रीम मे एन्ट्री असे अनेक आयटम सॉंग तिने केले आहेत.

राखी सोशल मीडियावर देखील अनेक वेगवेगळ्या घटनांवर वक्तव्य करत असते. यामुळे बऱ्याच जातीला ट्रोल देखील केले जाते. राखी बिग बॉस 15 मध्ये देखील झळकली होती. इथे ती पती रितेश बरोबर आली होती. या शोमध्ये देखील तिने दमदार खेळ खेळला. त्यामुळे तिचा चाहता वर्ग अधिक वाढला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *