आईच्या कडेवर बसलेली मुलगी सध्या करतेय बॉलिवूडवर राज्य

मुंबई | अभिनय क्षेत्रात अनेक नवनवीन अभिनेत्री येत असतात. नवीन अभिनेत्री आली की, प्रत्येकाला तिच्या आयुष्यातील सर्व गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशात एका अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.

या अभिनेत्रीने मराठी सिनेसृष्टीपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तर आता ती थेट हॉलिवूड पर्यंत देखील पोहचली आहे. फोटोत दिसत आलेली ही चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून “घो मला असला हवा” या गाण्यातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री राधिका आपटे आहे.

राधिकाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा अभिनय नेहमीच कौतुकास्पद राहिला आहे. तिने बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अशात आता तिच्या बालपणीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर तुफान लाइक्स आणि हार्ट इमिजीचा वर्षाव केला आहे.

राधिका आपटे मूळची पुण्याची असून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून तिचे शिक्षण झाले. त्यानंतर ती पुण्यातील ‘आसक्त’ या मराठी नाट्यसंस्थेमध्ये दाखल झाली. तू, पूर्णविराम, मात्र रात्र आणि कन्यादान इत्यादी मराठी नाटकांमधून तिने अभिनय केला. २००९ साली भारतातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेल्या ‘अंतहीन’ या बंगाली चित्रपटामध्ये तिने ‘बृंदा’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

तिने आजवर अनेक बोल्ड सीन्स देखील दिले आहेत. यामध्ये अनेक वेळा तिला ट्रोल देखील केलं गेलं आहे. मात्र ती या सर्व गोष्टींचा विचार करत नाही. तिला असे वाटते की, प्रत्येक अभिनेत्रीने अशा आव्हानात्मक भूमिका केल्या पाहिजे.

राधिका विवाहित आहे. ती साल 2011 मध्ये बेनेडिक्ट टेलरला लंडनमध्ये पहिल्यांदा भेटली. यावेळी ती डान्स शिकण्यासाठी तिथे गेली होती. या दोघांनी दोन वर्षे एकमेकांना डेट केले आणि साल २०१३ मध्ये काही जवळच्या लोकांच्या उपस्थित त्यांनी विवाह केला.

 

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *