मुलाचा जीव वाचवताना वडिलांनी देखील गमावला जीव

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यालगतच्या उस्मनाबाद येथील तुळजापूर तालुक्यातील खडकी या गावात ही घटना घडली. मुलगा गच्चीवर कपडे वाळत घालत होता. गच्चीवर कपडे वाळत घालत असताना अचानकपणे त्याला शॉक लागला. हे पाहताच आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी धाव घेतली.

अशावेळी वडीलांना देखील शॉक लागला.
तुळजापूरपासून सोलापूर जवळ असल्यानं त्यांना त्वरित सोलापूरमधील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अशावेळी त्या दोघांना मृत म्हणून घोषित करण्यात आलं.

सचिन श्याम भंडारे वय वर्षे (३५) आणि जय सचिन भंडारे वय वर्षे (११) असे शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचं मुलाचं नाव आहे. या घटनेने खडकी गावावर शोककळा पसरली आहे. गावातील सर्व ग्रामस्थ दुपारपासून सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुःख व्यक्त करताना दिसून आले.

मुलगा आणि वडील दोघांचा अपघात – घरावर कपडे वाळवत टाकण्यासाठी जय घरव गेला होता. अशावेळी कपडे शिकवताना तिथूनच एक महावितरणची वायर ठीतुंच पास होत होती. हात ओले असल्यानं लगेचच वायरीन करंट पास केला आणि जयला शॉक लागला. अशावेळी तो मोठ्यानं ओरडू लागला.

हा आवाज ऐकताच जायचे वडील घरावर आले. आपल्या मिळाले पाहून त्यांनी जीवाची कसलीही परवा न करता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रयत्न असफल ठरला आणि त्यात दोघेही बाप लेकर गमावली गेली.

अशावेळी येथील नागरिकांनी बाप लेकाला सोलापूरमधील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. अशावेळी येथील डॉक्टरांनी त्यांना मृत असल्याचं घोषित केलं. यावेळी खडकी या गावात मोठी शोककळा पसरली होती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *