‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुड न्युज, लवकरच होणार…

मुंबई | पवित्र रिश्ता या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आता चर्चेत आली आहे. अंकिता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहते. आपले वेगवेगळे ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर करत असते. अंकिताने सोशल मीडियावर आतापर्यंत तिच्या सर्व परिवाराची देखील ओळख करून दिली आहे. अशात आता तिच्या परिवारामध्ये आणखीन एक नवीन सदस्य दाखल होणार आहे.

सोशल मीडियावर अंकिताच्या घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकजण तर या पाहुण्याचे नाव देखील ठेवायला लागले आहेत. सोशल मीडियावर सतत कलाकारांच्या लग्नानंतर त्यांच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरू असतात. या चर्चेमध्ये आता अंकिता लोखंडेचे नाव देखील शामिल झाले आहे. नुकतेच आलिया भट्ट या अभिनेत्रीने आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. सोशल मीडियावर अनेक फोटोंमध्ये आलिया बेबी बंप दाखवताना दिसली.

आता टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ही देखील प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर अंकिता सतत तिचे आणि तिचा पती विकी जैन याच्याबरोबरचे फोटो शेअर करत असते. हे कपल चाहत्यांना खूप आवडतं. अंकिताने आत्तापर्यंत विकी बरोबरचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या दोघांचे रोमँटिक फोटो पाहताच चाहते त्यावर हार्ट इमोजीचा वर्षाव करतात.

असाच एक रोमँटिक फोटो अंकिताने पुन्हा एकदा सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी या दोघांनी काढलेले फोटो पाहून चाहते चकित झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच अंकिताने विकी जैन बरोबर लग्न केले. आता तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती प्रेग्नेंट असल्याचे दिसत आहे. या दोघांनी प्रेग्नेंट कपल ज्या पद्धतीने फोटोशूट करतात त्या पद्धतीने फोटो शूट केले आहे.

यावेळी अभिनेत्रीने सुंदर असा निळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे. हा वन पीस स्लीवलेस आणि डीप नेक आहे. यामध्ये तिने गळ्यामध्ये सुंदर एक लॉकेट घातल आहे. तसेच तिच्या मागे तिचा पती उभा आहे. तिच्या पतीने तिच्या पोटावर हात ठेवत फोटो काढला आहे.

एका फोटोमध्ये पतीने पोटावर हात ठेवल्यानंतर अंकिताने सुद्धा त्याच्या हातावर हात ठेवला आहे. प्रेग्नेंट कपल ज्या पद्धतीने फोटोशूट करतात त्याच पद्धतीने अंकिताने हे फोटोशूट केले आहे. यामध्ये तिचा बेबी बंप देखील दिसत आहे. हे फोटो पाहून चाहते चकित झाले आहेत. अनेक जण अंकिताला ती प्रेग्नेंट आहे का असे प्रश्न विचारत आहेत.

अंकिताने तिच्या पतीबरोबर शेअर केलेला या फोटोला कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “तुझा असेल त्या पद्धतीने मी तुला स्वीकारले आहे….” सध्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. साल 2021 मध्ये या दोघांनी लग्न केले. यावेळी दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

त्यांच्या लग्नाला आता जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले आहे. या काळात अंकिताने तिच्या संपूर्ण कुटुंबीयांची ओळख सोशल मीडिया मार्फत करून दिली. आता पुन्हा एकदा तिच्या कुटुंबात एक नवीन पाहुणा दाखल होणार असल्याने सर्वजण उत्सुक आहेत. मात्र असे असले तरी अजूनही अंकिताने आणि तिच्या पतीने या बातमीला दुजोरा दिलेला नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *