कित्येक दिवस बाळाचं आणि बायकोचं तोंडही पाहता येत नाही, कुटुंबासाठी शशांक झाला भावूक

मुंबई | छोट्या पडद्यावरील होणार सून मी या घरची ही मालिका खूप गाजली होती. अनेकांना या मालिकेचे भलतेच वेड लागले होते. अशात या मालिकेत शशांक हा श्री ची भूमिका साकारत होता. तर तेजश्री प्रधान ही जान्हवी हे पात्र साकारत होती. मालिकेत या दोघांच्या केमेस्ट्रीला प्रेक्षकांची खूप दाद मिळाली. या दोघांनी खऱ्या आयुष्यात एकत्र यावे असे अनेकजण म्हणत होते.

अशात मालिकेत असतानाच या दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली होती. हळूहळू यांचे प्रेम वाढू लागले. नंतर या दोघांनी लग्न केले. मात्र या दोघांचा विवाह फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच या दोघांचा घटस्फोट झाला. तेजश्री नेहमीच शशांकला जूनियर म्हणून चिढवायची. याच कारणाने या दोघांचा घटस्फोट झाला अशी देखील चर्चा त्यावेळी सुरू होती.

या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर शशांकने दुसरा विवाह केला. त्याला एक लहान बाळ देखील आहे. मात्र जान्हवी अजून सिंगल आहे. शशांकने प्रियांका ढवळे बरोबर लग्न केले. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. जेव्हा तो आपल्या घरी येतो तेव्हा त्याच्या कुटुंबीयांबरोबर खूप एन्जॉय करतो. तसेच अनेक फोटो शेअर करत असतो.

काही दिवसांपूर्वी प्रियांका आणि शशांकला एक गोंडस बाळ झालं. दोघेही आपल्या बळावर खूप प्रेम करतात. मात्र शशांक हा एक अभिनेता असल्याने शुटींगमुळे त्याला घरी जास्त वेळ देता येत नाही. आता याच गोष्टीची त्याला खूप खंत जाणवते आहे. त्याने ही खंत एका व्हिडिओमधून व्यक्त केली आहे.

शशांकने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्याकडे एटीएम दिसत आहे. हे एटीएम कचऱ्याने भरलेलं आहे. यावर त्याने लिहिलं आहे की, “आपलं जीवन पण असच आहे का?” तसेच व्हिडीओमध्ये तो म्हणत आहे की, ” मी माझ्या बाळाला आणि पत्नीला खूप मिस करतो. शूटिंगच्या कामासाठी मला नेहमी बाहेर रहावं लागतं.

त्यामुळे आमची भेट होत नाही. पण मला दोघांची पण खूप आठवण येते. माझी पत्नी आणि बाळ तिच्या माहेरी डोंबिवली येथे राहतात. मी ठाण्यात राहतो. मात्र शुटींगमुळे मी नेहमी मड आयलंड येथे असतो. त्यामुळे मला या दोघांना भेटन कठीण होत आहे. माझ्या बाळाच्या आठवणीने मी बऱ्याचदा रडतो. ” असं त्याने यामध्ये म्हटल आहे. त्याची ही भावूक पोस्ट पाहून अनेक चाहत्यांना देखील वाईट वाटत आहे. अनेकजण त्याला यावर कमेंट करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *