भावाला राखी बांधायचं स्वप्न राहील अपूर्ण; रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचा रेल्वे अपघात, वाचून डोळ्यात पाणी येईल

रोहा | नारळी पौर्णिमा सणाच्या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी अपघात घडले आहेत. अशात रोहा तालुक्यात देखील एका 19 वर्षीय तरुणीचा रेल्वे अपघातात जीव गेला आहे. अपघात एवढा भीषण होता की तरुणी जागीच मृत पावली.

रोहा तालुक्यातील एकता नगर येथे मिताली संदीप मोरे (१९) ही तरुणी राहत होती. रक्षाबंधन सणाच्या दिवशी ही तरुणी रेल्वेने एका ठिकाणी चालली होती. यावेळी रोहा नागोठणे मार्गावरील भिसे खिंड येथे तिला मालवाहू ट्रेनची जोरदार धडक बसली. या घटनेने मोरे कुटुंबीयांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वर्से ग्रामपंचायत हद्दीत राहत असलेली मिताली स्वभावाने अगदी शांत आणि गुणी मुलगी होती. मुंबईहून रोह्याला येणाऱ्या मालगाडीचा तिला धक्का लागला. यात ती रुळावर पडली गेली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. रक्षाबंधन सण असल्याने ती मस्त तयार झाली होती. घरात देखील आनंदाचे वातावरण होते. मात्र मुलीच्या मृत्यूने मोरे कुटुंबीय शोक सागरात बुडाले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *