आशिकी चित्रपटात हिरो पेक्षाही दमदार ठरलेल्या दीपक तिजोरीची मुलगी दिसते खूपच हॉट, या क्षेत्रात करते काम….

दिल्ली | कोरोना महामारी मुळे गेल्या अनेक दिवसांपासून ओटीटीला चांगलाच जोर आला होता. सर्व चित्रपट याच प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत होते. मात्र आता पुन्हा एकदा थिएटर सुरू झाल्याने शुक्रवारचा मुहूर्त साधत अनेक दिग्दर्शक आपला चित्रपट प्रदर्शित करत आहेत.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर मोठी चढाओढ पाहायला मिळते. कोणता चित्रपट हिट होणार तर कोणता चित्रपट फ्लॉप होणार हे सर्व काही प्रेक्षकांच्या हातात असते. प्रेक्षक ज्या चित्रपटाला अधिक पसंती देतात त्या चित्रपटातील कलाकार रातोरात स्टार बनतात. आतापर्यंत असे अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत ज्यामध्ये पहिल्या चित्रपटातून काही कलाकारांनी यशाची मोठी गवसणी घातली आहे.

अनेक कलाकारांचे पहिले चित्रपट फ्लॉप ठरतात. सुरुवातीचे बरेचसे चित्रपट नीट चालत नाहीत. मात्र मेहनत न सोडता काही कलाकार अभिनय करतच राहतात. त्यानंतर त्यांना देखील यश मिळते. मात्र काही अवलिये असे असतात जे त्यांच्या पहिल्या चित्रपटामध्ये अगदी सहकलाकाराची भूमिका साकारून देखील मोठ्या प्रसिद्ध झोतात येतात. महेश भट्ट यांचा आशिकी हा चित्रपट तुम्हाला आठवतच असेल. भन्नाट गाणी आणि प्रेम कथा यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती.

चित्रपटाच्या गाण्यांप्रमाणेच हा चित्रपट मोठा सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील मुख्य कलाकारांपेक्षा सहाय्यक कलाकार प्रेक्षकांना फार आवडले होते. यातील एका सहाय्यक कलाकाराने नंतर खूप मोठे यश मिळवले. साल १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या आशिकी या चित्रपटात दीपक तिजोरी, अवतार गिल, अनु अग्रवाल, राहुल रॉय अशी स्टार कास्ट होती. दीपक तिजोरी हे या चित्रपटामध्ये सहकलाकाराच्या भूमिकेत झळकले. महेश भट दिग्दर्शित दीपक यांचा हा प्रथमच चित्रपट होता. या चित्रपटामध्ये सह कलाकाराची भूमिका साकारून देखील ते खूप प्रसिद्ध झाले. त्यानंतर दीपक यांच्यापुढे वेगवेगळ्या मोठ्या प्रोजेक्टची रांग लागली.

त्यानंतर त्यांनी बादशहा, जो जीता वही सिकंदर, गुलाम, अंजाम, कभी हा कभी ना… अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली. 1993 मध्ये त्यांना मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट मिळाला. पेहला नशा असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटामध्ये महेश भट्ट यांची मुलगी या पूजा भट्ट आणि रविना टंडन या दोन अभिनेत्रींबरोबर दीपकने स्क्रीन शेअर केली.

बॉलीवूडच्या या अभिनेत्याने नेहमीच बहुरंगी भूमिका साकारल्या. कधी खलनायकाच्या भूमिकेत तर कधी सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत दीपक आपल्याला दिसले. अशात त्यांच्या मुलीला देखील घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले. त्यांची मुलगी देखील आता अभिनय क्षेत्रात मोठे नाव कमवत आहे. समारा असे दीपक यांच्या मुलीचे नाव आहे. नुकतीच तिने बॉलीवूडमध्ये झेप घेतली आहे. ग्रँड प्लॅन या चित्रपटामध्ये ती पहिल्यांदाच झळकली. त्याचबरोबर तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे.

जॉन अब्राहम याच्या ढीशुम या चित्रपटामध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. बॉब सिस्वाब या चित्रपटात देखील तिने अभिनय केला. ग्रँड प्लॅन या पहिल्याच चित्रपटातून तिची खूप चर्चा झाली. या चित्रपटात तिने लीप लॉक किस सीन शूट केले होते. त्यामुळे काहींनी तिला ट्रोल देखील केले होते. तर अनेकांनी तिचे कौतुक केले होते. लवकरच ती ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये देखील अभिनय करताना दिसणार आहे.

ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक वेळा तिने तिचे हॉट आणि बोल्ड फोटोशूट केलेले आहेत. तिचे सर्वच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. वेगवेगळ्या अंदाजामध्ये ती चाहत्यांना घायाळ करत असते. अभिनय क्षेत्राबरोबरच तिला क्रीडा विश्वामध्ये देखील आवड आहे. फुटबॉल हा तिचा आवडता खेळ आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *