या विनोदी अभिनेत्याचा झाला वेदनादायी मृत्यू, कारण वाचून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | बॉलीवूड सिनेसृष्टीमध्ये अनेक विनोदी कलाकार होऊन गेले. यातील अनेक विनोदी कलाकार हे आज आपल्यामध्ये नाहीत मात्र त्यांच्या अभिनयामुळे ते नेहमी आजरामर राहिले आहेत. त्यातीलच एक असल विनोदी अभिनेता रझाक खान. रझाक खान यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी खलनायक म्हणून अभिनय केला.

त्यांचा दमदार विनोदी अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत. अब्बास मस्तानी यांच्या बादशाह या चित्रपटामधून रझाक खान यांना पहिला ब्रेक मिळाला होता. पहिलाच चित्रपटातील अभिनयाने त्यांची वाहवाह झाली. काही वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

त्यांच्या शेवटच्या क्षणात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांच्या निधनाविषयी त्यांचे जवळचे मित्र शहजाद खान यांनी निधनाची माहिती दिली होती. त्यांनी एक पोस्ट शेअर करत सांगितले होते की, ” माझा मोठा भाऊ रझाक याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो आता आपल्यामध्ये राहिला नाही. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो.”

आजही त्यांचे चाहते त्यांच्या आठवणीमध्ये भाऊक होताना दिसतात. रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. यावेळी त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि रझाक यांनी या जगाचा निरोप घेतला.

साल 1999 मधील ‘बादशाह’ चित्रपटातील ‘माणिकचंद’ साल 1998 मधील ‘गुंडा’ चित्रपटातील ‘लकी चिकना’… ‘बाबू बिसलेरी’ 2003 मधील ‘हंगामा’ आणि ‘निंजा’ या चित्रपटांत त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. ‘हॅलो ब्रदर’मधला चाचा अशी अनेक पात्रे त्यांनी साकारली. 1993 मध्ये ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटातून त्यांनी एंट्री केली. ‘मोहरा’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘इश्क’, ‘दरार’ चित्रपट त्यांनी आपल्या कारकीर्दीत गाजवले.

2000 मध्ये त्यांनी ‘जोरू का गुलाम’, ‘हेरा फेरी’, ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि त्यानंतर ‘पार्टनर’, ‘भागम-भाग’, ‘फिर हेरा-फेरी’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये लोकांचे भरपूर मनोरंजन केले. ‘मकोडी’ रज्जाक या नावाने काम करून जगभरातील हिंदी चित्रपट रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *