‘छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखना रे…’ या गाण्यातून प्रसिद्ध झालेला बाल कलाकार आता करतोय हे काम

मुंबई | नव्वदच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये बाल कलाकार हमखास दिसत होते. हे बालकलाकार चित्रपटात एक वेगळाच आनंद आणि क्युटनेस आणायचे. त्यावेळी बहुसंख्य चित्रपटांमध्ये बाल कलाकार हमखास दिसत होते. आज देखील काही चीत्रेटांमध्ये बाल कलाकार पाहायला मिळतात. त्यामुळे आता पर्यंत या सिने सृष्टीलाअनेक बाल कलाकार मिळाले. ज्यांनी आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. यातील काही बाल कलाकार आता मोठे होऊन अभिनय क्षेत्रातच नाव कमवत आहेत. तर काही जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत.

आज आपण अनिल कपूर आणि श्री देवी अभिनित जुदाई या चित्रपटातील बाल कलाकारा विषयी जाणून घेणार आहोत. साल १९९७ मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात अनिल कपूर आणि श्री देवी यांचा एक छोटा आणि क्यूट मुलगा दाखवला गेला होता. हा क्यूट मुलगा आता खूप मोठा झाला आहे. त्याचं नाव ओमकार कपूर असे आहे. या चित्रपटा व्यतिरिक्त हा बाल कलाकार बॉलीवूडच्या अनेक कलाकारांना मुलगा बनला होता.

त्याने मासूम या चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने जुडवा, हिरो नंबर १, घूंघट, मासूम आणि मेला सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आजही त्याच्या बाल भूमिका प्रेक्षक आवरजून पाहतात. आपल्या बालपणी त्याने अनेक मोठ्या स्टार बरोबर काम केले आहे. अनिल कपूर, श्री देवी, उर्मिला मातोंडकर आणि सलमान खान अशा अनेक कलाकारांच्या चित्रपटामध्ये तो झळकला होता.

सलमान खानच्या जुडवा या चित्रपटात तो सलमानच्या लहानपणीची भूमिका साकारताना दिसला होता. यातील त्याचा क्युटनेस आणि अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. तसेच ओमकरचा पाहिला चित्रपट मासूम होता यातील ‘छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखना रे…’ हे गाणे त्यावेळी प्रचंड गाजले होते. आजही त्याचे हे गाणे अनेकांच्या ओठावर दिसते.

ओमकार जेव्हा थोडा मोठा झाला तेव्हा त्याने संजय लीला भंसाली आणि फराह खान, अहमद खान सारख्या अनेक बॉलीवूड दिग्दर्शकांना असिस्ट करायला सुरुवात केले. त्याचे स्वप्न होते की मोठा होऊन एक अभिनेता बनेल. मात्र त्याला अनेक ऑडिशन द्याव्या लागल्या. नंतर त्याला पहिली भूमिका प्यार का पंचनामा २ मध्ये काम करण्याची संधी मिळाली. साल २०१५ मध्ये आलेला ‘प्यार का पंचनामा २’ हा चित्रपट ‘प्यार का पंचनाम’चा सिक्वेल होता. चित्रपटामध्ये ओमकारने तरुण ठाकूर हे पात्र साकारले होते. या चित्रपटात त्याने दमदार अभिनय केला. त्यामुळे त्याची सगळीकडे वाहवा झाली.

अशात आता हा बाल कलाकार खूप मोठा झाला आहे. त्याचा क्यूटनेस आता मॅचो मॅनमध्ये बदलला आहे. ओमकारचा जन्म ३१ ऑक्टोबर १९८६ मध्ये मुंबईमध्ये एका हिंदू कुटुंबात झाला. ओमकारने नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षणही पूर्ण केले आहे. आता तो अभिनय क्षेत्रात आणखीन चांगल्या संधी शोधत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *