१ लाखांची गुंतवणूक करून सुरू केला होता व्यवसाय; फक्त २ वर्षांत झाली १२ कोटींची कमाई

दिल्ली | दीप्ती अवस्थी आणि विकास शर्मा हे दोघे पती पत्नी असून ते दिल्लीचे रहिवासी आहेत. इतर कपल लग्नानंतर आपल्या कुटुंबाचा विचार करतात. मात्र या दोघांनी त्या पलीकडे जाऊन एका नव्या बिझनेसचा विचार केला. या व्यवसायाने त्यांना अवघ्या दोन वर्षांत बक्कळ पैसा कमविण्यााठी मदत केली.

त्यांचा रेव्हेन्यू १२ कोटीहून अधिक झाला आहे. Gohoardings.com ची त्यांनी निर्मिती केली. आपल्या यशाबद्दल दीप्तीने एका मध्यामाला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या यशा बद्दल आणि संघर्षा बद्दल सविस्तर माहिती सांगितली. दीप्ती आणि विकास यांची ही कहाणी ऐकून तुम्हाला देखील व्यवसायात नशीब आजमवावे वाटेल.

दीप्ती ही दिल्लीतील नेहरू कॉलेजची विद्यार्थीनी होती. इथे तिने सीए साठी एडमिशन घेतले होते. तिला सीए व्हायचे होते. मात्र तिचे मन इथे खूप कमी दिवस रमले. त्यामुळे तिने पुढे काही तरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. ती काही तरी वेगळी संकल्पना शोधत होती. तितक्यात तिला एका मोठ्या इव्हेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यात ती ऑर्गणाईजर म्हणून पार्टनरशीपमध्ये काम करत होती. या इव्हेंटला खूप प्रसिद्ध व्यक्ती येणार होत्या. त्यामुळे तिच्यासाठी ही खूप मोठी संधी होती. हे काम तिने खूप मन लावून केले.

मात्र यात तिला ४० लाखांचे नुकसान झाले. कारण तिला या इव्हेंट साठी स्पॉन्सर मिळाले नाही. तसेच याचे तिकीट देखील विकले गेले नाही. यावेळी तिच्या पार्टनरने देखील तिला फसवले आणि तो तिची साथ सोडून निघून गेला. यावेळी ती खूप संकटात आली. यात तिला देखील सर्व सोडून पळून जावे वाटले. मात्र नंतर तिने विचार केला की, जर आज मी याच्याकडे पाठ फिरवली आणि पळ काढला तर मी आयुष्यभर आसेच करेल. त्यामुळे तिने तसे केले नाही.

अशात यावेळी तिला तिच्या वडिलांनी मोठी साथ दिली. तिच्या वडिलांनी खूप कमी पैशात घर विकले आणि तिच्यासाठी पैसा उभा केला. वडिलांचे हे ऋण मी कधीच विसरणार नाही असे ती म्हणते.

यावेळी पुढे तिने सांगितले की, ” मी ४० लाखांचे नुकसान केले होते. ही गोष्ट मला खूप त्रास देत होती. मला सतत हे आठवत होते. मला काहीच ठीक वाटत नव्हते. मी डिप्रेशनमध्ये गेले होते. कारण मी माझे शिक्षण देखील सोडून दिले होते. मात्र माझ्या बाबांनी मला पुन्हा एकदा धीर दिला. ते म्हणाले की, वाया गेलेले पैसे तू तुझ्या MBA च्या शिक्षणात खर्च केलेत असं समज. यातून खचून न जाता तुला चांगला धडा मिळाला आहे असे समज.”

यावेळी ती या दुःखातून हळूहळू बाहेर येऊ लागली. पुन्हा एकदा काही तरी नवीन करण्याची तिच्या मनात इच्छा होती. याच दरम्यान तिचे लग्न झाले. तिच्या पतीचे नाव विकास असून तो एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तसेच तो एका नामांकित कंपनीत नोकरी करत होता. हे दोघे जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांना समजले की, आपले विचार अगदी सारखे आहेत. कारण विकासला देखील मोठा व्यवसाय करायचा होता.

यावेळी त्याने आपली नोकरी सोडली आणि काही ठिकाणी पार्ट टाईम कामाला सुरुवात केली. यावेळी एका व्यक्तीला होर्डिंग्ज लावायचे होते. हे काम त्यांनी विकासला दिले. हे काम करत असताना त्याची खूप धावपळ झाली. मात्र यावेळी त्याच्या लक्षात आले की, हे काम आपण एका क्लिकवर लोकांसाठी उपलब्ध केले पाहिजे. त्यानंतर पुढे त्याने Gohoardings.com ची स्थापना केली.

आपल्या व्यवसायाबद्दल सांगताना ती दीप्ती म्हणली की, ” मार्केट मध्ये होर्डींग्ज या व्यवसायासाठी खूप पैसे खर्च होतात. यात बरेच दलाल आहेत. जे मध्ये पैसे खातात. आमची कंपनी याकडे लक्ष देते आणि मध्ये असलेल्या दलालांना आम्ही काढून टाकले आहे. तसेच कमी खर्चात आम्ही हे होर्डिंग्ज लोकांपर्यंत पोहचवत आहोत. ”

या दोन्ही पती पत्नीने जेव्हा हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते. दोघांनी ५० हजार रुपये काढत असे एक लाख जमवून हा व्यवसाय उभा केला. मात्र फार २ वर्षांत त्यांचा १२ कोटींचा टर्नओव्हर झाला. आता येत्या वर्षांत त्यांनी ५० कोटींचे टार्गेट ठेवले आहे.

Gohoardings.com या कंपनीकडे सध्या १ लाख ३० हजार साईट रजिस्टर आहेत. या विषयी दीप्ती पुढे म्हणाली की, ” आम्ही खूप जलद गतीने आणि स्वस्त दरात काम करतो. कुणाला होर्डिंग्ज लावायचे असेल तर फक्त २४ तासांत आम्ही हे काम पूर्ण करतो. यामध्ये तुम्ही तुमच्या ग्राहकांना जे वचन देता ते पूर्ण करणे खूप आवश्यक आहे. ”

नोयेडामध्ये असलेल्या या कंपनीत सध्या सेल्स आणि मार्केटिंग पकडुन एकूण २० व्यक्ती कार्यरत आहेत. दीप्ती म्हणते की, ” आम्ही ओयोला फॉलो करतो. आम्हाला देखील अशीच एक भारतीय कंपनी तयार करायची आहे जी संपूर्ण जगात चालू शकते.”

येवढ्या मोठ्या यशा नंतर देखील हे दोघे आपल्या आयुष्यातील तो खडतर काळ विसरलेले नाहीत. दीप्ती म्हणली की, ” सर्व जण लग्न करून सेटल होतात. आम्हाला देखील अनेक व्यक्तीने असेच सांगितले. मात्र आम्ही तसे न करता रिस्क घेतली. त्यामुळे आज आम्ही आमचे स्वप्न पूर्ण करू शकलो आहोत. आम्ही दोघांनी एकत्र खूप स्वप्ने पाहीली आहेत. मात्र ती पूर्ण करण्याठी आम्ही अजूनही मेहनत घेत आहोत. ”

दीप्ती तिच्या कामासाठी नेहमी तत्पर राहिली आहे. जेव्हा ती आई होणार होती तेव्हा तिने डॉक्टरांना तिची नॉर्मल डिलिव्हरी करा असे सांगितले होते. कारण तिला लवकरच कामावर रुजू व्हायचे होते. यावेळी डिलिव्हरी नंतर काही दिवसांची विश्रांती घेऊन ती लगेच ऑफिसमध्ये गेली होती.

दीप्ती म्हणते की, ” माझे काम माझा ऑक्सिजन आहे. माझं माझ्या मुलांवर देखील प्रेम आहे. मात्र मी जे काम हाती घेतलं आहे ते पूर्ण केल्याशिवाय मला चैन पडत नाही. ” दीप्तीची ही कहाणी अनेक व्यक्तीसाठी प्रेरणा दाई आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *