फोटोत दिसणारा चिमुकला गाजवतोय मराठी कलाविश्व, आई देखील अभिनय क्षेत्रात आहे सक्रिय

मुंबई | सध्याच्या घडीला सोशल मीडियावर प्रत्येकच व्यक्ती सक्रिय असतो. सोशल मीडिया हे एक असं माध्यम झालं आहे जिथे आपल्याला कोणत्याही व्यक्तीची पुरेशी माहिती मिळूच शकते. याला कलाकार तर अजिबात अपवाद नाहीत.

कलाकार त्यांचे सर्व अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशात अनेक कलाकारांनी त्यांच्या बालपणीचे देखील फोटो सोशल मीडिया वरती पोस्ट केलेले आहेत. प्रत्येकच व्यक्तीला आपलं बालपण नेहमीच हवहवसं वाटतं. बालपणातील सर्व मजा मस्ती आठवून अनेक जण आनंदी होतात.

अशात सोशल मीडियावर सध्या एका मराठी अभिनेत्याचा बालपणीचा फोटो खूप चर्चेत आला आहे. फोटोत दिसत असलेला हा चिमुकला सध्या मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालतो आहे. त्याने आपल्या आईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माझा होशिलना या मालिकेत पदार्पण केले. एव्हढ्यात तुम्हाला समजलेच असेल की, मी अभिनेता विरजास कुलकर्णी बद्दल बोलत आहे.

विराजस दिसायला खूप हँडसम आहे. त्याने माझा होशील ना या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले. हॉस्टेल डेज हा त्याचा पहिला चित्रपट होता. अनाथेमा या नाटकामध्ये त्याने अभिनय तसेच दिग्दर्शनाचं काम देखील केलं. तसेच मृणाल कुलकर्णी यांच्या बरोबर रमा या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी स्वीकारली.

त्याने डावीकडून चौथी बिल्डिंग या नाटकाचे देखील दिग्दर्शन केले होते. यामध्ये अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने अभिनय केला होता. याच वेळी विराजास आणि शिवानी एकमेकांच्या प्रेमात पडले. बराच काळ या दोघांनी एकमेकांना डेट केले नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शिवानी ही देखील मराठी सिनेसृष्टीमध्ये कमालीची सक्रिय आहे. तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा या मालिकेमध्ये रमाबाईंचे पात्र साकारले होते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *