सलमान खानची चांदणी म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्रीवर आलीय वाईट वेळ; करतेय हे काम

मुंबई | मनोरंजन विश्वात काम करत असताना अनेक अभिनेत्री काम मिळवण्यासाठी खूप धडपड करतात. काहींना लवकर काम मिळते मात्र काहींना सुरवातीला अनेक सहाय्यक भूमिका कराव्या लागतात त्यानंतर त्यांना मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळते. मात्र अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांना त्यांच्या पहिल्याच ऑडिशनमध्ये मुख्य भूमिकेसाठी निवडले गेले. ज्यामुळे त्या एका रात्रीत मोठ्या प्रसिद्धी झोतात आल्या. मात्र नंतर त्यांचे चित्रपट फ्लॉप ठरले म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्र सोडून दिले. अशीच एक अभिनेत्री चांदणी.

सलमान खानची चांदणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीचे नाव नविदेता शर्मा आहे. मात्र तिच्या पहिल्याच बेवफा सनम या चित्रपटामुळे तिला आजही अनेक व्यक्ती चांदणी म्हणून ओळखतात. आता ही चांदणी साध्या अभिनयात सक्रिय नाही. ती आता काय करते कुठे आहे. या विषयी बातमीमधून जाणून घेऊ.

नवोदित ही तिचं शिक्षण पूर्ण करत असतानाच तिने एका जाहिरातीसाठी ऑडिशन दिली होती. मात्र यावेळी तिच्या एकाच ऑडिशनमध्ये ती चांदणी झाली. या चित्रपटात तिला अभिनेता सलमान खान बरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. पहिलाच चित्रपट पहिलीच ऑडिशन आणि पहिल्यांदाच सलमान खान सारख्या सुपरस्टार बरोबर काम करून ती एका रात्रीत मोठी स्टार झाली.

तिच्या अभिनयाचा डंका सर्वत्र वाजला. तिचा अभिनय पाहून अनेकांनी त्यावेळी तिचे खूप कौतुक केले. त्यानंतर देखील या अभिनेत्रीने अनेक चित्रपटात काम केले. बचपन का, जान से प्यारा, ए लव स्टोरी, जय किशन, हिना, इक्के पे इक्का सारखे अनेक चित्रपट या अभिनेत्रीने केले. मात्र तिचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल करू शकले नाही.

त्यावेळी सलमान खानचा मैने प्यार किया हा चित्रपट खूप हिट ठरला होता. या चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाने तो खुप गाजला होता. त्यानंतर लगेचच हा त्याचा दुसरा चित्रपट होता. त्यामुळे निवेदिताला देखील प्रसिध्दी मिळाली होती. मात्र नंतर तिचे चित्रपट चालत नव्हते. तरी देखील ती अभिनय क्षेत्रापासून दूर गेली नाही. ती काम करत राहिली. मात्र नंतर एकामाोमाग एक चित्रपट फ्लॉप ठरले. त्यामुळे ती खूप खचून गेली. नंतर तिने लग्न केले आणि कायमचा बॉलीवूडला रामराम केला. १९९६ मध्ये आलेला हाहाकार या चित्रपटात ती शेवटची दिसली.

त्याचं वर्षी तिने सतीश शर्मा बरोबर लग्न केले. तो अमेरिकेत राहत होता. लग्ना नंतर ती देखील अमेरिकेत राहू लागली. या दोघांना दोन मुली आहेत. अभिनेत्रीला बॉलीवूड खूप आवडत होते. त्यामुळे तिने आपल्या दोन्ही मुलींची नावे बॉलीवुडच्या मोठ्या अभिनेत्रींच्या नावाने ठेवली आहेत. तिच्या मोठ्या मुलीचे नाव करिष्मा आहे तर छोट्या मुलीचे नाव करीना आहे. आता ही अभिनेत्री अमेरिकेत भारतीय नृत्य शिकवते. सी या नावाने तिने आपली एक डान्स अकॅडमी सुरू केली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *