सुंदर दिसायचं म्हणून अभिनेत्रीने केली शस्त्रक्रिया, मात्र त्यानंतर चेहरा इतका विद्रूप झाला की ओळखनही झालंय कठीण

दिल्ली | सिने क्षेत्राचा जण माणसावर एवढा परिणाम आहे की, प्रत्येक जण आपल्या कलाकारा प्रमाणे केस, कपडे आणि इतर अन्य फॅशन करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये काही फॅन आपल्या कलाकारासाठी खूप वेडे झालेले असतात. त्यांच्या प्रेमा खातर चाहते वेगवेगळे चॅलेंज स्वीकारतात.

अशात जर एखाद्या फॅनने आपल्या आवडत्या कलाकाराचा हुबेहूब चेहरा मला पाहिजे अशी मागणी केली तर? खरं तर हे फार कठीण काम आहे. मात्र एका मॉडेलने ते केलं आहे. मात्र आता ती एवढी भयावह दिसत आहे की, तिला तिचा मूळ चेहरा परत पाहिजे आहे.

कार्दशियन-जेनर्स सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. केवळ अमेरिकाच नाही तर जगभरातील अनेक देशांतील लोक आणि टीव्ही स्टार कार्दशियन आणि जेनर सिस्टर्सला फॉलो करतात. विशेषत: किम कार्दशियनचा विचार केला तर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

फॅशन शोमध्ये रॅम्पवर चालणे असो किंवा किमचे डेटिंग लाइफ, किम नेहमीच चांगल्या किंवा वाईट गोष्टींनी चर्चेत असते. पण, यावेळी किमच्या चर्चेचा विषय स्वतः किम नसून मॉडेल जेनिफर पॅम्प्लोना आहे. किमसारखे दिसण्यासाठी जेनिफरने प्लास्टिक सर्जरी केली पण आता तिला तिचा जुना चेहरा परत मिळवायचा आहे.

किम कार्दशियन सारखे दिसण्यासाठी, जेनिफर पॅम्प्लोनाने १२ वर्षांत सुमारे ४० वेळा कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केली आहे. ज्यामध्ये तिने ६०० हजार डॉलर्स म्हणजेच ४,७७,११,४०० रुपये खर्च केले. एवढी मोठी रक्कम आणि एक दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतर आता जेनिफरला पूर्वीसारखाच चेहरा मिळवायचा आहे, ज्यासाठी तिला १२० हजार डॉलर्स म्हणजेच ९५,४३,१६२ रुपये खर्च करावे लागणार आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर जेनिफर म्हणते की, लोक तिला कार्दशियन म्हणायचे, त्यामुळे ती अडचणीत येऊ लागली. जेनिफर पॅम्प्लोना एका मुलाखतीत म्हणाली की, “मी काम केले, अभ्यास केला आणि मी एक बिझनेसवुमन देखील होते. मी माझ्या आयुष्यात खूप काही मिळवले, पण हे सर्व केल्यानंतरही लोक मला ओळखत होते कारण मी एक कार्दशियन आहे. म्हणजे मी तिच्यासारखी दिसत आहे म्हणून लोक मला ओळखत होते.”

लोक कार्दशियन बहिणींना त्यांच्या कामामुळे कमी आणि सोशल मीडिया मॉडेलिंग आणि प्लास्टिक सर्जरींमुळे जास्त ओळखतात. आता यात काइली जेनर असो, किम कार्दशियन असो किंवा वारंवार दिसणारा चेहरा ख्लो कार्दशियन असो सगळ्यांना त्यांच्या वेगवेगळ्या प्लास्टिक सर्जरीसाठी सोशल मीडियावर ट्रोल केले जाते.

जेनिफर पॅम्प्लोना १७ वर्षांची होती जेव्हा तिची पहिली शस्त्रक्रिया झाली. जेनिफरने केवळ चेहराच नाही तर संपूर्ण शरीर बदलून किमसारखे बनवले. जेनिफरने तिचे शरीर किमसारखे दिसावे यासाठी राइनोप्लास्टी, बट इम्प्लांट आणि फॅटचे इंजेक्शन देखील घेतले. जेनिफर म्हणते की, ” या चेहऱ्याचा आता मला त्रास होत आहे. माझ्या चेऱ्यावरील वेदना वाढल्या आहेत. तसेच आता मला माझा आधीचा चेहरा परत पाहिजे.” आता जेनिफर डी-ट्रान्झिशन प्रक्रियेत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *