पाकिस्तानी खेळाडू बरोबर प्रेम केल्याने या अभिनेत्रीला भोगाव्या लागल्या नरक यातना

मुंबई | प्रेम म्हणजे विश्वास असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतो. यामध्ये अनेकांचे आयुष्य सफल होते. तर काही व्यक्ती आयुष्यातून उठून जातात. कारण त्या व्यक्ती आपल्या प्रेमासाठी चुकीच्या व्यक्तीची निवड करतात. यामुळे जेव्हा हे प्रेम तुटते त्यावेळी होणारा त्रास हा फक्त आणि फक्त त्या व्यक्तीला जाणवत असतो.

बॉलीवूड हे एक असं ठिकाण आहे जिथे रोजच कोणी ना कोणी एकमेकांच्या प्रेमात पडत असतं. चित्रपटात काम करताना कलाकार एकमेकांच्या जवळ येतात आणि मग त्यांच्या प्रेमाला सुरुवात होते. अशात बॉलीवूडमध्ये अनेक पाकिस्तानी व्यक्तींशी नाव जोडलेले कलाकार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रेमाची चर्चा ही भलतीच मोठी असते.

बॉलीवूड मधील एक सुंदर अभिनेत्री अशीच एका पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात पडली. तिने त्याला आपल्या आयुष्यात खूप मोठं स्थान दिलं. मात्र आता तिला आपल्या प्रेमाचा पस्तावा होतं आहे. तिने आयुष्यात घेतलेला सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय हाच होता असं तिला वाटत आहे. कोण आहे ही अभिनेत्री आणि काय आहे तिची दुःखद प्रेम कहाणी हेच या बातमीमधून जाणून घेऊ.

८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय. या अभिनेत्रीने या काळात यशाला मोठी गवसणी घातली होती. तिच्या दमदार अभिनयाने तिच्या पुढे त्या काळी सर्व अभिनेत्री फिक्या पडल्या होत्या. “जरुरत ” या चित्रपटातून तिने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. तिचा हा पहिलाच चित्रपट खूप गाजला. याच चित्रपटाने तिला रातोरात मोठे स्टार बनवले.

मात्र तिच्या एका चुकीमुळे तिला खूप मोठी किंमत चुकवावी लागली. अभिनेत्रीने जरुरत नंतर नागीण या चित्रपटात काम केले. याने ती आणखीन प्रसिद्ध झाली. हा चित्रपट तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी देणारा ठरला. यावेळी प्रत्येक दिग्दर्शकाला तिच्या बरोबर काम करायचे होते. तिच्या समोर अनेक मोठ्या चित्रपटांची रांग लागली होती.

नागीण या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारात सर्वोत्तम अभिनेत्रीचे नामांकन देखील मिळाले होते. मात्र याच वेळी तिच्या आयुष्यात एका पाकिस्तानी खेळाडूची एन्ट्री झाली. ती मोहसीन खान या खेळाडूला भेटली. यावेळी सुरुवातीला मैत्री झाली. नंतर हीच मैत्री प्रेमात बदलली. अभिनेत्री मोहसीनच्या प्रेमात एवढी वेडी झाली होती की, तिने आपल्या सर्व चित्रपटांमध्ये पाठ फिरवली आणि त्याच्या बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर अभिनेत्री आपल्या पती बरोबर पाकिस्तानमध्ये राहू लागली. त्यांचे सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. मात्र नंतर हळूहळू या दोघांमध्ये वाद होऊ लागले. काही काळाने हे वाद खूप वाढले. त्यामुळे दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोट घेऊन अभिनेत्री भारतात परतली त्यावेळी तिला चित्रपट मिळत नव्हते. मी स्वतः च्या हाताने मझी सर्व मेहनत वाया घालवली असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *