टायगर श्रॉफ आणि श्रीवल्लीचा तो व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर धुमाकूळ

दिल्ली | दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वांची क्रश असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिचा अभिनय तिचे चित्रपट आणि तिची क्युटनेस नेहमीच सर्वांना भावत असते. तिच्या लुकमुळे तर ती नेहमीच चर्चेत असते मात्र यावेळी तिच्या चर्चेचे कारण काही वेगळेच आहे.

तिच्या चर्चेमध्ये एका बॉलीवूड अभिनेत्याचे नाव जोडले जात आहे. अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या डान्समुळे आणि अभिनयामुळे मोठ्या प्रसिद्ध झोतात आलेला आहे. टायगर त्याच्या डॅशिंग अंदाजामुळे चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित करतो. सध्या सोशल मीडियावर या दोन्ही कलाकारांच्या विषयी चर्चा रंगली आहे.

या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र दिसत आहेत. व्हिडिओ पाहून हे कोणत्या कामासाठी एकत्र आले आहेत की या दोघांमध्ये आणखीन काही वेगळे सुरू आहे असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

रश्मिका आणि टायगर श्रॉफ हे दोन्हीही कलाकार चाहत्यांचे खूप पसंतीचे आहेत. हे दोघे जर एकत्र आले तर चाहतांना या दोघांना एकत्र पाहणं खूप आवडेल. काही नेटकरांनी या दोघांच्या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. अशात यातील एका युजरने या दोघांमध्ये प्रेम संबंध आहेत का असा देखील प्रश्न विचारला आहे.

चाहत्यांच्या मनामध्ये येत असलेले वेगवेगळे प्रश्न पाहून रश्मीकाने याविषयी आता खुलासा केला आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ” हो आणि दोघं एकत्र काम करत आहोत. एका जाहिरातीसाठी आम्ही दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.

टायगर बरोबर काम करताना खूप आनंद झाला. आमची ही जाहिरात पाहून तुम्ही करत असलेल्या वेगवेगळ्या कमेंटमुळे मी हे स्पष्टीकरण देत आहे. लवकरच टायगर आणि मी एका चित्रपटांमध्ये देखील एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. आमच्या कामाला तुमचे प्रेम मिळेल अशी आशा व्यक्त करते.”

रश्मिकाची ही पोस्ट आता सोशल मीडियावर आणखीनच वायरल होत आहे. टायगर आणि रश्मिका या दोघांना एकत्र चित्रपटात पाहणे चाहत्यांसाठी खूप औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन्ही कलाकारांनी आपापली सिनेसृष्टी चांगलीच गाजवलेली आहे. दोघांचाही एक वेगळा आणि मोठा चाहता वर्ग आहे.

रश्मिकाच्या अभिनयातील कारकिर्दी विषयी बोलायचे झाल्यास. पुष्पा या चित्रपटांमधून ती मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली. लवकरच ती पुष्पा या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये देखील झळकणार आहे. तसेच रश्मीका बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. मिशन मजनू हा तीचा प्रथम बॉलीवूड चित्रपट ठरणार आहे. टायगर श्रॉफ कडे देखील बरेच आगामी प्रोजेक्ट आहेत. बडे मिया छोटे मिया आणि रेम्बो या आगामी चित्रपटांमध्ये तो दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by INDIAN (@indian_cenema_news)

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *