टप्पू नाही तर बीट्टू, तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत मोठा बदल…

गोकुलधम | तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिका आणि यातील पात्र चाहत्यांचे खूप मनोरंजन करतात. अशात या मालिकेतील काही कलाकार आता मालिका सोडत आहेत.

अनेक कलाकार ही मलिका सोडून गेले आहेत. नुकतीच तारक मेहता हे पात्र साकारत असलेल्या कलाकाराने ही मालिका सोडल्याने त्या जागी आता शैलेश लोढा अभिनय करताना दिसतो आहे. त्याने देखील तारक मेहता हे पात्र छान साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

यासह नट्टू काका हे पात्र देखील बदलले आहे. तारक मेहता का उलटा चष्मा या कार्यक्रमाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर याची माहिती दिली आहे. असित मोदी यांनी याची माहिती दिली असून लवकरच आता वेगळे नट्टू काका अभिनय करताना दिसणार आहेत. अशात आता आणखीन एक अभिनेता ही मलिका सोडत असल्याची चर्चा रंगली आहे.

राज अनाडकट हा कलाकार तारक मेहता का उलटा चष्मामध्ये टप्पु हे पात्र साकारत होता. आता तो बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असून त्याने ही मालिका सोडल्याची चर्चा रंगली आहे. अशात आता त्याच्या जागी कोणता कलाकार टप्पू हे पात्र साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तर अशात या शोच्या एका प्रोमो व्हिडिओमध्ये नट्टू काका नंतर आणखीन एकाची एंट्री होणार आहे. प्रोमोमध्ये दिसते आहे की, यामध्ये टप्पू नाही तर बीट्टू या पात्राची एन्ट्री होणार आहे. हे पात्र हुबेहूब टप्पू सारखे दिसते. मात्र अद्याप या बद्दल आणखीन ठोस माहिती मिळाली नाही.

अशी चर्चा सुरू आहे की, मालिकेतून टप्पू हे पात्र काढून टाकले असून त्या जागी फक्त बीट्टू दिसणार आहे. मात्र तो नेमका कोण आहे. जेठालालचा तो मुलगा आहे का असे प्रश्न उपस्थित राहिले आहेत. मालिकेच्या आगामी भागणंध्येच या सर्वाचा उलगडा होईल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *