‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या चाहत्यांना बसणार मोठा धक्का, आणखीन एका प्रसिद्ध कलाकाराने सोडली मालिका…

मुंबई | मालिका विश्वात ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा सर्वाधिक पाहिला जाणारा शो आहे. या शोचे लाखो चाहते आहेत. अशात गेल्या अनेक दिवसांपासून या शोमध्ये दयाबेन दिसत नव्हती. त्यामुळे प्रेक्षक तिला पाहण्यासाठी आतुर झाले होते. दयाबेन साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिने साल 2017 मध्ये या शोमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर कोरोना काळ उलटला. अशात आता दयाबेन पुन्हा एकदा या शोमध्ये परतणार आहे अशा चर्चा सुरू झाल्या.

मात्र नंतर माहिती समोर आली की, दिशा वकानी ही दुसऱ्यांदा आई झाली आहे. त्यामुळे तिला शो मध्ये परत येता येणार नाही. या मालिकेच्या निर्मात्यांनी देखील अशी घोषणा केली की, इथून पुढे मालिकेमध्ये दयाबेन हे पात्र दिशा साकारणार नाही. दया हे पात्र साकारण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या अभिनेत्रींच्या ऑडिशन घेत आहोत.

त्यानंतर या शोमधील आणखीन एका व्यक्तीने शो सोडल्याची माहिती समोर आली. शैलेश लोढा हा अभिनेता मालिकेमध्ये तारक मेहता ही प्रमुख भूमिका साकारत होता. मात्र काही कारणास्तव त्याने सुद्धा ही मालिका सोडून दिली. त्यामुळे या शो संदर्भात चाहते थोडे चिंता व्यक्त करू लागले. तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो पूर्णपणे बंद पडणार की काय? अशी चिंता चाहत्यांना वाटू लागली. सोशल मीडियावर या मालिकेतील सर्व कलाकारांविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या.

अशात आता या मालिकेतील आणखीन एक कलाकार हा शो सोडून गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. मालिकेमध्ये टप्पू हे पात्र प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करत होते. टप्पू ही भूमिका सुरुवातीला भव्य गांधी साकारत होता. त्याने ही मालिका सोडल्यानंतर टप्पू हे पात्र राज अनाडकट साकारताना दिसला. तर आता अशी चर्चा आहे की, राजने ही मालिका सोडली आहे. मालिकेत सांगितले जात आहे की, टप्पू त्याच्या पुढील शिक्षणासाठी परदेशी गेला आहे. त्यामुळे तो मालिकेत दिसत नाही. मात्र वास्तविक पाहता मालिकेत टप्पू न दिसण्याचे कारण वेगळेच आहे असे समजते.

कारण मालिकेमध्ये टप्पू बरोबर असलेले त्याचे सर्व मित्र दिसत आहेत. फक्त टप्पूचं दिसतं नाही. त्यामुळे राजने ही मालिका सोडली आहे असे सर्वजण म्हणत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज विषयी अशी चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप या चर्चेला तारक मेहता का उल्टा चश्माचे निर्माते आणि स्वतः राज या दोघांपैकी कोणीही दुजोरा दिलेला नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *