T20 WorldCup – विश्वचषकात बुमराहची जागा घेणार ‘हा’ खेळाडू

मुंबई | ( Ind vs aus) ट्वेंटी 20 | 6 ऑक्टोंबर रोजी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाणार होती. 16 ऑक्टोंबर पासून ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. परंतु या चषकात भारताचा सुप्रसिद्ध गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचं समजतंय. यामुळे भारताला मोठा धक्का बसलाय. जसप्रीत बुमराह हा त्याच्या गोलंदाजीसाठी भारतातील अधिकच महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे.

बूमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे खेळताना दिसणार नाही. यामुळे भारतीय व्यवस्थापनेत व्यत्यय निर्माण होतोय. बुमराहच्या नसण्यान भारतात गोलंदाजीममध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. यासाठी गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, हर्षल, हर्षदीप सिंग हेच वेगवान गोलंदाज आहेत. मोह्ममद शमी किंवा दीपक चहर यांपैकी एकाला तरी संधी मिळेल.

भारताकडे फिरकी गोलंदाज अनुभवी आहेत. युजवेंद्र चहल, आर. आश्विन, हर्षल पटेल हे गोलंदाज आहेत. परंतु हे ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर फारसा त्याचा उपयोग होणार नाही. यावर्षीच्या विश्वचषकात एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे हार्दिक पांड्या. हा एक उत्तम गोलंदाज देखील आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदिप सिंग

ऑस्ट्रेलिया संघ – ॲरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, ॲश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, नॅथन एलिस.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *