गाण्याच्या स्पर्धेत स्वराजने मारली बाजी, पिहूचा हा अपमान महागात पडणार का?

मुंबई | तुझेच मी गीत गात आहे ही मालिका आता एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेमध्ये स्वरा आणि पिहू या दोघीजणी आम्ही सामने आल्या आहेत. दोघींमध्ये मोठी स्पर्धा रंगली असल्याने चाहते ही स्पर्धा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी मल्हारची आई खूप आजारी झाली त्यामुळे मल्हारने आईसाठी एक नवस केला. शंभरानात मुलांना दत्तक घेण्याचा त्याने नवस केला होता. यामध्ये त्याने स्वतःचीच मुलगी स्वरा हिला देखील दत्तक घेतल आहे. स्वराला बाबा असून देखील ती अनाथ मुलाच जीवन जगत आहे. तुझे बाबा भेटत नाहीत तोपर्यंत तू स्वरा नाही तर स्वराज म्हणून राहायचं असं तिच्या मामाने तिला सांगितलं होतं. त्यामुळे चिमुकली स्वरा ही मुलगी नाही तर मुलगा बनून स्वराज या नावाने राहते.

अशाच अनाथ आश्रमाच्या जवळच संगीताची एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये पिहू आणि स्वराज दोघेही सहभागी होतात. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मल्हार कामातला बोलावले जाते. मात्र त्याच्या एका गाण्याचे रेकॉर्डिंग असल्याने तो त्याच्या भावाला परीक्षक म्हणून पाठवतो. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर पिहूला असं वाटतं की तिचा काका या स्पर्धेचा परीक्षक आहे त्यामुळे तिलाच प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळणार.

अशात ज्यावेळी पीहू स्टेज वरती गाणं गाण्यासाठी जाते त्यावेळी तिथे सूर ऐकून सर्वजण कान बंद करतात. तसेच तिला तिथून निघून जाण्यासाठी सांगतात. मात्र ती तिचं गाणं संपूर्ण गायल्यानंतरच तिथून जाते. त्यानंतर स्वराज गाण गातो. स्वराज्याच्या सुरांनी सर्वजण मंत्रमुग्ध होतात. परीक्षकांना देखील त्याचं गाणं खूप आवडतं. सर्वजण त्याच्या गाण्याला चांगली दात देतात. अशात या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक नेमका कोण पटकावणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती.

स्वराज्याचे गाणं इतर सर्वांपेक्षा उत्तम होतं त्यामुळे त्यालाच प्रथम पारितोषिक मिळेल असं सर्वांचं म्हणणं आहे. मात्र पिहूला प्रथम पारितोषिक मिळावं यासाठी मोनिकाने मल्हारच्या भावाला दहा लाख रुपये दिलेले आहेत. मात्र तरीदेखील प्रथम पारितोषिक हे स्वराजलाच मिळते. यामुळे पिहू खूप रडते. अशा या गोष्टीचा बदला घेण्यासाठी पिहू काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *