स्वप्ना चौधरीचे एका शोचे मानधन ऐकून तुम्हाला देखील येईल चक्कर, एका शोसाठी घेते लाखोंचे मानधन…..

मुंबई | हरियाणा इंडस्ट्रीमधील आघाडीची डान्सर सपना चौधरीला आज कोणत्या विशेष ओळखीची गरज राहिलेली नाही. आपल्या डान्समुळे तिने संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली आहे. तिच्या डान्स स्टेप्स नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करतात.

सपना चौधरी दिसायला अतिशय सुंदर आहे. ती नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये असते. सोशल मीडियावर तिची फॅन फोलॉइंग खूप जास्त आहे. आपल्या डान्स मधून तिने यशाचे मोठे शिखर गाठले आहे. सध्या सोशल मीडियावर तिची तुफान चर्चा होतं आहे.

गरीबी आणि मजबुरी म्हणून तिने वयाच्या १४ व्या वर्षी डान्स करायला सुरुवात केली होती. यावेळी अनेकदा तिने रस्त्यावर असलेल्या स्टेजवर देखील डान्स केले आहेत. तिच्या कमरेच्या ठुमक्यांनी ती अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवते. नाईलाज म्हणून सुरू केलेल्या डान्सने आज तिला यशाच्या मोठ्या शिखरावर नेऊन ठेवले आहे.

आता ती फक्त भारत नाही तर परदेशात जाऊन देखील तिचे नृत्य सदर करत असते. आता पर्यंत तिचे यूट्यूबवर अनेक डान्स व्हिडिओ आले आहेत. सुरुवातीला ती व्हिडिओ बनवून ते अपलोड करायची. मात्र आता तिच्या डान्सचे अनेक अल्बम येतात. तिचे सर्वच अल्बम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आपल्या डान्स मधून ती प्रसिध्दी बरोबर बक्कळ पैसे देखील कमवते. ती आपल्या एका डान्स साठी लाखोंचे मानधन घेत असते. तिचा एक शो तीन तासांचा असतो. या तीन तासांचे ती लाखो रुपये घेते. एका स्टेज शो मध्ये ती २५ ते ३० लाख रुपये कमवते. जर शो ३ तासांपेक्षा कमी म्हणजे एक तासाचा असेल तर ती त्यासाठी ३ ते ४ लाख मानधन घेते. असे अनेक वृत्तांमध्ये सांगण्यात आले आहे.

सपना तिच्या म्युजिक अल्बममधून देखील लाखोंची कमाई करते. एका अल्बम साठी ती ५० लाख रुपये मानधन घेते. तिची प्रसिध्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अगदी बॉलीवूडच्या राखी सावंतला देखील मागे टाकत ती पुढे जात आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *