सुष्मिता सेनला अखेर तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळाला? लवकरच करणार लग्न!

मुंबई | बॉलीवूडची मिस युनिव्हर्स अभिनेत्री सुष्मिता सेन ही अनेकांची क्रश आहे. नव्वदच्या दशकातील ही सुपरहिट ठरलेली अभिनेत्री अजूनही सिंगल आहे. मात्र आता लवकरच ती क्रिकेट विश्वातील एका व्यक्तीशी लग्न गाठ बांधणार आहे. याविषयीचा खुलासा देखील समोर आलेला आहे. अभिनेत्रीचा होणारा पती नेमका कोण आहे हेच या बातमीतून जाणून घेऊ.

माजी आई पी एल चेअरमन ललित मोदी आणि सुष्मिता या दोघांचे गेल्या अनेक दिवसांपासून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे अशा चर्चांना सोशल मीडियावर मोठे उदान आलं. अनेक नेटकरी असं म्हणू लागले की, सुश्मिता आणि मोदी या दोघांनी गपचूप पद्धतीने लग्न देखील केला आहे. या सर्व गोष्टींचा भडीमार सोशल मीडियावर होत असलेल्या पाहून मोदी यांनी आता त्यांच्या मनातली गोष्ट माध्यमावर सांगितली आहे. तसेच सुश्मिता बरोबर त्यांचे नेमके कोणते नाते आहे याविषयीचा देखील त्यांनी खुलासा केला आहे.

ललित मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून या गोष्टीची माहिती दिली. त्यांनी ट्विट करत असे लिहिले की, ” आमचे लग्न झालेले नसून आम्ही दोघे फक्त एकमेकांना डेट करत आहोत. लवकरच आम्ही लग्न देखील करू.” यावेळी त्यांनी सुश्मिताचे वर्णन बेटर हाफ अशा शब्दात केले आहे. सुष्मिता बद्दल ही बातमी ऐकून चहाते फार खुश आहेत. सुष्मिता सेन ही एक सिंगल मदर आहे.

सुष्मिताने आतापर्यंत अनेक व्यक्तींना डेट केल आहे. आता तिचं वय 47 वर्षे एवढे झाले आहे. मात्र अजूनही ती एक सिंगल मदर आहे. काही दिवसांपूर्वी ती रोहमनला डेट करत होती. यावेळी तिला नेटकर यांनी भरपूर ट्रोल केलं होतं. कारण तिचा बॉयफ्रेंड त्यावेळी तिच्यापेक्षा वयाने फार कमी होता. दोघांच्या वयात तब्बल पंधरा वर्षांचा अंतर होतं. सुस्मिता आता ४७ वर्षांची आहे आणि रोमन ३० वर्षांचा आहे. वयात एवढा फरक असून देखील अडीच वर्ष त्याला डेट केल.

मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर सुश्मिता पहिल्यांदा विक्रम भट यांच्या प्रेमात पडली होती. दस्तक या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या दोघांची भेट झाली होती. साल १९९६ मध्ये या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली मात्र नंतर यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर सुष्मिता रणदीप हड्डाच्या प्रेमात पडली. कर्मा, कन्फेक्षण आणि होली या चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान या दोघांमध्ये मैत्री झाली होती मात्र हे नातं देखील फार काळ टिकलं नाही. साल 2013 मध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसीम अक्रम बरोबर देखील सुस्मिताचे नाव जोडले गेले होते. या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सोशल मीडियावर उफाळून आल्या होत्या. तसेच हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत असे देखील म्हटल जात होतं. या सर्व माहितीला अफवा ठरवलं. साल २०१५ च्या आसपासच्या काळात सुस्मिता ऋतिक भसीनवर देखील प्रेम करत होती. अनेक वेळा या दोघांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले होते. मात्र नंतर या दोघांच नातं देखील तुटलं. दिग्दर्शक मुद्दसर अझीझ यांना देखील सुश्मिता डेट करत होती. असेच यांच्या दुल्हा मिल गया या चित्रपटात तिने काम केलं होतं. मात्र हा चित्रपट आणि या दोघांची प्रेम कहाणी देखील फ्लॉप ठरली.

आतापर्यंत सुस्मिताने अनेक व्यक्तींवर प्रेम केल आहे. मात्र आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवड करावी असा व्यक्ती तिला भेटलाच नाही. काही दिवसांपूर्वीच ती लग्नातील एका वक्तव्यावरून चर्चेत आली होती. तिचं असं म्हणणं होतं की, तिने तीन वेळा लग्न करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिन्ही वेळा तिला देवाने वाचवलं. तिच्या या वक्तव्यावरून ती खूप चर्चेत आली होती. मात्र आता पुन्हा एकदा ती लग्नाची रिस्क घेणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *