सिंघमला मागे टाकत हा चिमुकला चक्क वाघाबरोबर करत आहे मैत्री, ओळखा पाहू हा आहे तरी कोण?

मुंबई | बॉलीवुड चित्रपटांमध्ये आता पर्यंत तुम्ही अनेकदा हिरोला हिंस्त्र प्राण्यांना धूळ चाखवताना पाहिलं असेल. यातील काही कलाकार हे अगदी बालपणापासूनच खूप धीट आणि अनोख्या अंदाजात राहिले आहेत. त्यातीलच एक अजय देवगण. अजय आणि त्याचा अभिनय याची वेगळी ओळख करून देण्याची आज गरज नाही. कारण त्याने आपल्या अभिनयाने अनेक व्हीलनची पळता भुई थोडी केली आहे.

सध्या त्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका वाघ्याच्या बछड्याबरोबर स्माईल देताना दिसतो आहे. यावरून अंदाज येतो की, तो लहान असताना पासूनच खूप धीट आहे. त्याने हिंमतवाला या चित्रपटात देखील असाच एक भयभीत करणारा सीन दिला होता. त्यावेळी अनेकांना तो सीन पाहून घाम फुटला होता.

आता त्याचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. यामध्ये त्याच्या हातात असलेला बछडा मात्र खेळण्यातील सॉफ्टटॉय आहे. पण त्याचा हा फोटो पाहून अनेक जण त्याच्या हिंमतिची दाद देत आहेत. हा फोटो वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरला आहे. अनेक जण यात कमेंटमध्ये त्याला पुन्हा एकदा हिंमतवाला असे म्हणत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा हा फोटो शेअर केला होता. जो आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आजवर अजयने सर्वच प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. त्याने रोमँटिक, ऍक्शन, ड्रामा, कॉमेडी या सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये अभिनय केला आहे. फुल ओर काटे हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. याच चित्रपटातून त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर संग्राम आणि शक्तिमान अशा चित्रपटांमध्ये तो झळकला. दील है बेताब, दिलवाले, रबडी हे चित्रपट देखील खूप गाजले. हम दिल दे चुके सनम या चित्रपटात देखील त्याच्या अभिनयाला खूप पसंती मिळाली.

या चित्रपटात त्याच्या बरोबर सलमान खान आणि येश्र्वर्या राय या दोन कलाकारांनी स्क्रीन शेअर केली होती. यात तो सलमान खानवर देखील भारी ठरला होता. सध्या तो सिंघम म्हणून बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे. या चित्रपटात त्याची प्रेम कथा आणि पोलीस ऑफिसरची ड्युटी सगळ्यांना आवडली. विशेष म्हणजे या चित्रपटातील “आता माझी सटकली….” हे गाणं भन्नाट गाजलं होतं. आजही या गाण्याची क्रेझ कायम आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *