सनी देओलची प्रकृती खालावली; अमेरिकेत उपचार सुरू

मुंबई | मनोरंजन विश्वातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता आणि खासदार सनी देओल सध्या अमेरिकेत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही तो दिसला नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. आता समोर आलेल्या माहितीनुसार, सनी देओल अमेरिकेत असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आता या सर्व प्रकरणी अशी माहिती समोर येत आहे की, सनी एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान जखमी झाला. यात त्याच्या पाठीला मोठा मार लागला. यावर सुरुवातीला भारतात उपचार केले गेले. मात्र त्याला बर वाटत नसल्याने त्याला अमेरिकेत उपचारांसाठी नेले गेले. इथे आल्यावर त्याच्या पाठीचे दुखणे अधिक वाढले त्यामुळे तो निडणुकीला देखील हजार राहू शकला नाही.

त्याच्या अनुपस्थितीबद्दल माहिती देताना, त्याच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले आणि सांगितले की, “काही आठवड्यांपूर्वी सनी देओलला शूट दरम्यान पाठीला दुखापत झाली होती. प्रथम त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू होते आणि नंतर दोन आठवड्यांपूर्वी त्याला उपचारांसाठी यूएसएला हलवण्यात आले. या दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या आणि तो देशात नव्हता कारण त्याचे उपचार अजून संपले नव्हते. तो बरा झाल्यानंतर भारतात परतणार आहे.”

सनी देओलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो बाप या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि जॅकी श्रॉफ देखील दिसणार आहेत. याशिवाय तो मल्याळम क्राईम थ्रिलर ‘जोसेफ’चा हिंदी रिमेक असलेला ‘सुर्या’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एम. पद्मकुमार करणार आहेत. यासोबतच सनी देओल ‘गदर 2’ आणि ‘अपने 2’ या चित्रपटांचा सिक्वेलही घेऊन येत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *