जयदीप आणि गौरीच्या नात्यात पुन्हा येणार का दुरावा?

मुंबई| मराठी मालिका विश्वातील सुख म्हणजे नक्की असतं ही मलिका खूप लोकप्रिय ठरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या मालिकेवर खूप प्रेम करत आहेत. अशात मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत. त्यामुळेच आजही ही मालिका टीआरपीच्या पहिल्या पदावर विराजमान आहे.

मालिकेत सतत काहीनाकाही वाद दाखवले जात आहेत. अशात लहान पणापासून ज्या घराची अविरत सेवा केली त्या घराची गौरी राणी झाली आहे. शिरके पाटलांच्या गादीवर ती विराजमान झाली आहे. माई आणि दादांची लेक असलेली गौरी मालिकेत आता आपल्याला वेगळ्या लूकमध्ये दिसते. शालिनीने तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच जयदीप पासून देखील तिला दूर केलं होतं. तू घरातली मोलकरीण आहेस आणि तसचं राहायचं असं शालिनी तिला म्हणाली होती. मात्र तिचा सर्व डाव तिच्यावरच उलटला आणि गौरी माई दादांची लेक असल्याचं सिद्ध झालं.

यामध्ये आता जयदीप हा शिरके पाटलांच्या कुटुंबातील वारसदार नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्यांच्या गृह उद्योगातून देखील त्याला बाजूला करण्यात आल आहे. तसेच गौरी आता इथून पुढे हा कारभार सांभाळणार आहे. ती या कंपनीची नवीन सीईओ आहे. ऑफिसमध्ये तिच्या साठी सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. तेव्हा अनेक सर्वांनी तिचे कौतुक केले. मात्र यावेळी शालिनिने आता नवीन डाव रचला आहे. जयदीपला गौरी प्रमाणे नोकराची वागणूक द्यायची असं तीच म्हणणं आहे.

त्यामुळे गौरीचा सत्कार असतो तेव्हा त्याच्या नावाची खुर्ची तिथे ठेवली जात नाही. अशात त्याचा तिथे मोठा अपमान होती. मात्र गौरी यावेळी देखील जयदिपची साथ देते. ती ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना उभ करते. तसेच जो पर्यंत जायदिपची खुर्ची येत नाही तोपर्यंत कुणीच बसायचं नाही. अशी शिक्षा सर्वांना देते. यावर शालिनी आणखीन चिडते आणि आता तिने जयदीपला गौरी बद्दल वाईट सांगायला आणि भडकवयला सुरुवात केली आहे. अशात जयदीप देखील तिच्या जाळ्यात फसताना दिसतो आहे.

त्यामुळे जयदीप आणि गौरी यांच्यात थोडी बाचाबाची देखील होते. यावर गौरी जयदीपला समजवते की, शालिनी तुला माझ्या विषयी भडकवत आहे. तसे तू देखील तिच्या जाळ्यात फसत आहेस. मात्र जयदीपला तिचं म्हणणं खोटं वाटत आहे. तो उलट गौरीला ओरडत आहे. जयदीप आणि गौरी खूप दिवसांनी एकत्र आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शालिनीमुळे या दोघांची देखील दिशाभूल झाली होती. मात्र आता हे सर्व पुन्हा एकदा घडणार का? जयदीप गौरीला चुकीचं ठरवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *