Success Story | दिल्लीतील छोटा आइस्क्रीम वाला असा झाला करोडपती; उघडली तब्बल २०० दुकाने

मुंबई | इस्क्रीम ही सर्वांनाच आवडते. यात विशेष म्हणजे लहान मुलांना तर याच प्रचंड वेड असतं. पण तुम्हाला माहीत आहे का? याच ऑस्क्रीमचे दोन विभाग आहेत. एक म्हणजे एक म्हणजे दुधापासून बनविलेली आइस्क्रीम आणि दुसरं म्हणजे फ्रोजन आइस्क्रीम. आज याच आइस्क्रीममुळे कोट्यवधी रुपयांचा नफा कमवणाऱ्या एका व्यवसायीका विषयी जाणून घेणार आहोत.

ज्ञानी गुरुचरण सिंह यांनी साल १९५६ मध्ये आपल्या घराजवळ एक छोटे इस्क्रिमचे दुकान सुरू केले होते. त्यावेळी कुणालाच याची कल्पना नव्हती की, त्यांचा हा व्यवसाय त्यांच्या पुढील पिढ्या अनेक पिढ्यांपर्यंत सुरू राहील आणि एक दिवस थेट आंतरराष्ट्रीय बाजारात आपली ओळख बनवेल.

त्यांच्या नावानेच त्यांच्या ऑस्क्रीमचा ज्ञानी नववचा ब्रँड आज आंतरराष्ट्रीय बाजारात पोहचला आहे. सहा दशकांहून अधिक काळ ज्ञानी आईस्क्रीम खवय्यांच्या जिभेवर राज्य करत आहे. ज्ञानी गुरुचरण सिंह यांच्या तिसऱ्या पिढीचे वंशज तरनजीत सिंह यांनी एका माध्यमाला त्यांच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या ज्ञानी ऑक्रीमचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे.

सुरुवातीला त्यांनी सांगितले की, ” आपल्या माहीत पाहिजे की, आईस्क्रीम ही दोन घटकांमध्ये मोडते. एक म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची आईस्क्रीम असते. तर दुसरे म्हणजे फ्रिजन डेझर्ट यात वनस्पतींच्या तेलाचा वापर केला जातो.

तरनजीत यांचे आजोबा ज्ञानी गुरुचरण सिंह हे आधी पाकिस्तानात राहत होते. १९५६ मध्ये त्यांनी भारत गाठले. दिल्लीतील फतेहपुर, चांदणी चौक येथील बजबज असलेल्या बाजारात त्यांनी आपली ज्ञानी आईस्क्रीम विकण्यास सुरुवात केली. त्यांचा हा व्यवसाय त्यांनी अगदी थोड्याच पैशांत सुरू केला. त्यांनी एक छोटे दुकान घेतले. यात ते त्यांनी स्वतः च्या हाताने बनवलेली रबडी विकत होते. नंतर यात त्यांनी त्यांची आइस्क्रीम देखील विकायला सुरुवात केली. आज त्यांची ज्ञानी आईस्क्रीम संपूर्ण भारतात पसरली आहे. त्यांचे एकूण २१० दुकाने आहेत. तसेच फक्त दिल्लीतच त्यांची या ज्ञानी आईस्क्रीमची ४० दुकाने आहेत.

• चांदणी चौकापासून राष्ट्रीय स्तरावरील विक्री पर्यंतचा प्रवास – फतेहपुर येथील चांदणी चौकात सुरू झालेला ज्ञानी ब्रांड जगभर पोहोचवण्यासाठी ज्ञानी गुरुचरण सिंह यांनी सुरुवातीला फार मेहनत घेतली आहे. त्यांचे नातू तरनजीत आपल्या आजोबांच्या मेहनती विषयी सांगताना म्हणतात की, ” माझ्या आजोबांनी चांदी चौकात जेव्हा हा व्यवसाय सुरू केला तेव्हा तिथे त्यांच्या हाताने बनवलेली मिठाई लोकांना देत होते. त्याकाळी जास्त उपकरणे नसल्याने ते स्वतःच्या हाताने रबडी बनवायचे. त्यांच्या रबडीचे अनेकांना वेड लागले होते. माझ्या आजोबांनी केलेल्या या कार्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो.”

रबडी बरोबरच त्यांच्या दुकानात अन्य काही मिठाई देखील होत्या. त्याचबरोबर ते वेगवेगळे ज्यूस देखील विकायचे. तरनजीत यांनी पुढे सांगितले की, ” त्याकाळी माझ्या आजोबांनी बनवलेली ज्ञानी मिठाई खूप चर्चेत होती. राज कपूर आणि मोहम्मद रफी यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींना देखील ग्यानी मिठाई खूप आवडायची.”

सन 1960 च्या मध्यात ज्ञानी गुरुचरण सिंह यांचे मोठे पुत्र देखील या व्यवसायात सामील झाले. गुरबचरण सिंह असे त्याचे नाव होते. या बापलेकांनी मिळून आपल्या व्यवसायाचा वाढता पसारा आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेता सर्वप्रथम एक जुन्यातील फ्रीजर खरेदी केला. त्यानंतर दोघे मिळून आपला व्यवसाय पुढे नेऊ लागले.

तब्बल तीस वर्षे हा व्यवसाय चांदणी चौकातील त्या छोट्याशा दुकानात सुरू राहिला. मात्र हळूहळू ग्राहकांची मागणी वाढू लागली. ग्राहकांनी त्यांच्या ज्ञानी ब्रँडला खूप पसंती दिली. त्यामुळे त्यांना आपले दुकान देखील वाढवण्याची गरज होती. जास्त माल दुकानात भरून ठेवण्यासाठी चांदणी चौकातील ते दुकान पुरेसे नव्हते.

त्यामुळे त्यांनी थोक बाजारात आणखीन एक दुकान सुरू केले. हे दुकान नवीन असल्याने सुरुवातीला त्यांनी कमी पैशात जास्त आईस्क्रीम विकली. ग्राहकांना आपल्या ज्ञानी आईस्क्रीमची चव जास्त चाखायला मिळाली तसेच व्यवसाय वाढावा यासाठी त्यांनी कमी पैशात अधिक सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला.

तरनजीत यांना पुढे आपले उत्पादन विकण्यासाठी ग्राहकांच्या वेगवेगळ्या कॅटेगिरी समजून घेणे गरजेचे आहे असे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ग्राहकांचे वेगवेगळे गट तयार करत त्या त्या गटातील ग्राहकाला त्या पद्धतीने सेवा पुरवली. ते पुढे म्हणतात की, ” फतेहपुर येथील चांदणी चौकात असलेल्या दुकानातच माझी ट्रेनिंग पूर्ण झाली होती. उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून चविष्ट आईस्क्रीम कशी बनवायची हे माझ्या वडिलांनी मला शिकवले होते. 1990 मध्ये मी या व्यवसायात माझे पहिले पाऊल ठेवले. यावेळी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपला आणखीन एक दुकान असावं असं मला वाटलं. त्यामुळे मी रजोरी गार्डन येथे एक आईस्क्रीम पार्लर सुरू केले. ”

त्यांनी सुरू केलेले हे नवीन आईस्क्रीम पार्लर तेव्हापासून आतापर्यंत मोठ्या प्रगतीपथावर आहे. तरनजीत यांनी पुढे आपल्या ज्ञानी आईस्क्रीममध्ये वेगवेगळे फ्लेवर आणायला सुरुवात केली. सध्या त्यांच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये एकूण १०० फ्लेवरच उपलब्ध आहेत. आता फक्त दिल्लीत त्यांच्या चाळीस फ्रेंचाईजी आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, ” नव्वदच्या दशकात जेव्हा आम्ही व्यवसाय आणखीन प्रबळ करण्यास सुरुवात केली तेव्हा आम्ही अमेरिका आणि इटली येथून काही मशीन आयात केल्या. त्याचबरोबर आम्ही आमचे कर्मचारी देखील अधिक वाढवले. यावेळी आम्ही या वेगवेगळ्या फ्लेवरचे प्रयोग करत होतो. मात्र त्याचवेळी निरुला हा ब्रँड आमच्यासाठी मोठा प्रतिस्पर्धी बनला होता. कारण या ब्रँडने एक मोठा विभाग काबीज केला होता.”

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *