सुबोध भावेने सेलिब्रेट केला लाडक्या मुलाचा जन्मदिवस; केक होता खुपचं हटके

मुंबई | सतत कोणत्या न कोणत्या कारणांमुळे कायम सुबोध भावे हे चर्चेत असतात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून लाखो चाहत्यांना आपलंसं करून घेतलं आहे. फक्त चित्रपट नाहीत तर त्यांनी इतर देखील अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे.

यामुळे लाखो दीलोकी धाडकन म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते. एक उत्कृष्ट मराठी कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय राहणाऱ्या कपल्स पैकी ते एक आहेत. कारण त्यांच्या पत्नी मंजिरी भावे देखील सोशल मीडियावर फार सक्रिय असतात.

त्यांचा देखील एक वेगळा चाहता वर्ग बनला आहे. सध्या सुबोध आणि मंजिरी दोघे अत्यंत चर्चेत विषय ठरत आहेत. याच कारण म्हणजे त्यांचा मुलगा कान्हा याचा वाढदिवस, आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता. हा वाढदिवस सुबोध यांनी हटके स्टाईलने साजरा केला आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत.

या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी एक केक खास डिझाईन केला आहे. या केकवर फुटबॉल सिम्बॉल, तसेच स्पोर्ट शूज, तंदूर प्लेट, एअरफोन आणि मजेशीर म्हणजे टॉयलेट सिज सुद्धा या केक वर बनविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या वाढदिवसाची विशेष चर्चा होऊ लागली आहे.

कान्हा याला ज्या ज्या गोष्टींची फार आवड आहे अशा गोष्टींचे फोटो त्यांनी त्या केक वर टाकले आहेत. सुबोध आणि मंजिरी हे आपल्या दोन्ही मुलांचे फोटो सोशल मीडियावर कायम पोस्ट करत असतात. आज देखील त्यांनी एका हॉटेल मध्ये मोठ्या थाटात मुलाचा जन्मदिवस साजरा केला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *