‘एकदा संधी द्यायला हवी होती’ सुसाईड नोट लिहून विद्यार्थ्याची आत्महत्या; वाचून डोळ्यात पाणी येईल

रायबरेली | माध्यमिक घाटातील शालेय विद्यार्थी आत्महत्या करत असतानाच्या अधिक घटना घडत आहेत. रायबरेलीत अशीच घटना घडली आहे. कॉपी करण ही चूक आहे. परंतु एकदा तरी संधी द्यावी. की त्यासाठी छळ केला जावा? मारहाण आणि अपमान करण्यात यावा? अशी चूक झाली असल्यास दुसरी संधी दिली जाऊ नये का? असे अनेक प्रश्न सुसाईडनोट मध्ये लिहून ठेवले आहेत. आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव यश सिंह मौर्या वय वर्षे (१२) इयत्ता सातवीत होता. शिक्षक आणि मुख्यद्यापक यांच्या जाचाला कंटाळून रायबरेलीतील राहत्या घरात ओढणिन गळफास लावला आणि आत्महत्या केली.

त्याच्या शाळेत जीवशास्त्राचा पेपर होता. पेपर लिहताना त्यान कॉपी केली. नेमकी ती मॅडमने पकडली. त्याला सर्वांसमोर अपमानित केलं. त्याला मारल आणि थेट मुख्याध्यापिका मॅडमच्या केबिनमध्ये दाखल केलं. त्यामुळे यश नाराज होता. घरी आल्यावर तो कोणासोबत काहीच बोलला नाही. तो वर असलेल्या त्याच्या खोलीत गेला. सुसाईड नोट लिहून त्यानं आपल जीवन संपवल.

यशच्या कुटुंबीयांनी शिक्षकांवर फोडल खापर – यशन शाळेतील शिक्षिका आणि मुख्याध्यापक यांच्या जाचान जीवन संपवलं आहे अस त्याच्या वडिलांनी म्हंटल आहे. राजीव यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापिका रजनाई डिसुझा आणि शिक्षिका मोनिका मागो यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचं मूळ गाव बछरावा सेहगो येथील रहिवासी असलेला यश सिंह मौर्य गेल्या ५ वर्षांपासून जवाहर विहार कॉलनीतील त्याचे काका राजकुमार मौर्य यांच्या घरी शिक्षणासाठी राहत होता.

सेंट पीटर्स शाळेत इयत्ता सातवीत शिकत होता. त्याच्या शाळेत सध्या सहामाही परीक्षा सुरू आहे. जीवशास्त्राचा पेपर सुरू असताना तो कॉपी करताना पकडला गेला. यानंतर शिक्षिकेनं यशला सर्वांसमोर मारलं, त्याला अपमानित केलं, असे आरोप यशच्या कुटुंबानं केले आहेत. मुख्याध्यापिकेवरही मारहाणीचे आरोप झाले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *